मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील आज ५३ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा करोनामुळे मृत्यू झाला. पोलीस दलातील हा दुसरा बळली आहे. वाकोल वाकोला पोसीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका ५७ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा करोनामुळे मृत्यू झाला. यासंबंध मुंबई पोलिसांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आपल्या दोन पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Mumbai Police lost two brave souls in a span of two days. Head Constable Sandip Surve (52) lost his life to Coronavirus.
May the departed soul rest in peace. Thoughts and prayers for the Surve family and friends.
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) April 26, 2020
“आपल्या दोन पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.मी सगळ्यांच्या वतीने आदरांजली वाहिली”, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२६ एप्रिल) फेसबुक लाईव्हद्वारे राज्याती जनतेशी संवाद साधताना सांगितले.महाराष्ट्रात लॉकडाउनच्या काळात पोलीस जीवाची पर्वा न करता कोरोनाविरुद्ध युद्ध लढत आहेत. राज्यभरात ९६ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ अधिकारी आणि ४ पोलीस यातून बरे झाले असून अन्य पोलिसांवर उपचार सुरु आहेत. यात सर्वाधिक फटका मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.