HW News Marathi
महाराष्ट्र

‘आप’च्या नौटंकीला मी काडीची किंमत देत नाही! – प्रविण दरेकर

मुंबई। निदर्शने करणे, १०-१२ लोकांना घेऊन आंदोलने करणे यामुळे प्रसारमाध्यमांत नाव येते. प्रसिद्धी मिळते. पण माझ्यावर बेबुनियाद आरोप करणारे आपचे धनंजय शिंदे, काँग्रेसचे नाना पटोले, भाई जगताप यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा मी करणार आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.

आपच्या धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या कार्यालबाहेर आंदोलन करण्यात आले. त्यासंदर्भात दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाबार्ड, आरबीआयही यावर तपास करत आहे. मी मुंबई बँकेचा चेअरमन १० वर्षे होतो. नाबार्डने एनपीए, सीआरएआर, प्रॉफिट रेशो याचे उत्तम अभ्यास करून गौरवान्वित केले आहे.

दरम्यान, १५ हजार कोटींचा घोटाळा असणारी बँक २ हजार कोटींचा घोटाळा कुठून करणार. परंतु आरोप करणारे, आणि तो दाखवणारे यांना त्याची सत्यता न पटल्यामुळे असे आरोप होत असतात. यासाठी यंत्रणा आहे, न्याय व्यवस्था आहे. त्यांच्या दरबारी सत्य-असत्य ठरेल. त्यामुळे यांच्या या नौटंकीला मी काडीची किंमत देत नाही. उलट १५ कोटीची बँक २ हजार कोटींचा घोटाळा कसा करेल, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषा गौरवदिनी ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा! – सुभाष देसाई

Aprna

एमएसईबीचे कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

News Desk

पडळकरांच्या जीवाला काही झाले तर…!; पत्राद्वारे फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

News Desk