HW News Marathi
महाराष्ट्र

दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला

फलटण | पुणे पंढरपूर मार्गावर बरड येथे झालेल्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन अल्पवयीन मुलांसह दोन महिला असे एकूण पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर चार जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

सोलापूरहून पुण्याच्या दिशेने चाललेली कार क्र. एचएम १४ बीसी-९४८० ही शनिवारी दुपारी बरड गावाजवळ आल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर धडकली. या गाडीत एकूण नऊ जण होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर फलटणच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत निवडणूक: बिनविरोध निवडणुकीत शिवसेनेनं मारली बाजी

News Desk

रमेश देव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक; अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”, शालिनी ठाकरेंचा सवाल

Jui Jadhav