HW News Marathi
महाराष्ट्र

Belgaum Election | भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा २९०३ मतांनी पराभव

बेळगाव | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती. यात भाजपतर्फे सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडी, तर काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अंगडी आणि जारकीहोळी यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती. तसेच, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मैदानात उतरलेले शुभम शेळके यांनीही चुरशीची लढत दिली होती.

महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली होती, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज बेळगावात आली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप असे पाहिले जात होते. परंतु अनपेक्षितपणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी रंगत निवडणुकीत आली होती. बेळगावसह कर्नाटकातील १५ पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ यांना दिलासा

News Desk

PandharpurElection : सातव्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे यांची १ हजार मतांची आघाडी

News Desk

राज्यात सत्तांतरानंतर ‘गोकुळ’ला अच्छे दिन, नवी मुंबईत दिली जागा, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk