HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवा झेंड्याचे अनावरण केले आहे. मनसेच्या नव्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्र आहे. मनसेच्या या नव्या झेंड्यावर राजमुद्र वापरल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.  मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून मनसेच्या विराेधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. यावरून संभाजी ब्रिगेडेने स्वारगेट पोलीस ठाण्यात  मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या महाराजांची राजमुद्र असलेल्या भगव्या रंगाच्या झेंड्याचे आज (२३ जानेवारी) महाअधिवेशनात अनावरण केले. मनसेने नव्या झेंड्यातून हिंदुत्ववादी विचारांची कास धरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनसेचे हे पहिले सर्वात मोठे अधिवेशन मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथे सुरू आहे.

संभाजी ब्रिगेडने तक्रारीत काय म्हटले

‘छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही शिवरायांची प्रशासकीय मुद्रा असून, राजमुद्रेचा वापर करुन शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले. शिवरायांच्या लाेककल्याणकारी प्रशासनाचे प्रतिनिधित्व करणारी राजमुद्रा ही रयचेच्या राज्याचे सार्वभाैमत्व सिद्ध करणारी आहे. तीचा वापर काेणत्याही राजकीय पक्षाने करणे हे चुकीचे असून प्रांत, भाषा, जात – धर्म यावर आधारित राजकारण करणाऱ्या मनसे राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा काेणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहाेत. तसेच राज ठाकरे ( संस्थापक) मनसे यांनी राजमुद्रेचा गैरवापर केले प्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईल आंदाेलन करण्यात येईल’ असे तक्रार अर्जात म्हंटले आहे.

 

Related posts

#InternationalYogaDay : कोरोनाला हरवायचे असेल तर योग आवश्यक | पंतप्रधान मोदी

News Desk

‘शिवभोजना’साठी आधारकार्ड सक्ती नाही, छगन भुजबळांनी दिली माहिती

अपर्णा गोतपागर

गोदापार्कचा पॅटर्न पुण्यात राबवण्याचा राज यांचा मनोदय

News Desk