HW News Marathi
महाराष्ट्र

“… तर बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो”, नितिन राऊतांचं वक्तव्य

पुणे।पुणे शहरातील आंबील ओढ्याच्या कारवाई प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी देखील आता हात घातलाय पुणे महापालिकेला लाज वाटली पाहिजे, माझ्या नागपुरात अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो’ असं नितीन राऊत म्हणाले.पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते याचवेळी नितीन राऊत यांनी आंबील ओढा परिसरातील अनधिकृत बांधकामावर देखील कारवाई प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या महाभयंकर आजारांमुळे लॉकडाऊन असल्याने शेकडो लोकांचा रोजगार बुडाला आहे. अशा या बिकट परिस्थिती गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना पुणे महापालिकेला लाज वाटली पाहिजे. महापौर काय झोपा काढत होते का? असा सवाल विचारत राऊत यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली.

तर पावसाळ्यात, महामारीच्या काळात कारवाई केली. महिलांचे केस ओढले, या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी, माझ्या नागपुरात जर अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो, अशी मागणीही राऊत यांनी केली.

आंबील ओढ्यात बिल्डर अजित ओव्हर यांच्या जवळचा पालकमंत्र्यांनीच तोडकाम कारवाई न थांबवण्याचे आदेश दिले असा आरोप होत आहे, असं माध्यमांनी विचारल्यावर याला ‘पुणे पालिकाच जबाबदार आहे’ असं सांगत नितीन राऊत यांनी काढता पाय घेतला.

काय आहे आंबिल ओढा प्रकरण?

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली.

बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याठिकाणी आंबिल ओढ्यात ७०० ते ८०० पोलिसांचा बंदोबस्त त्यावेळी तैनात करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मंत्री गुलाबराव देवकरांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मार्ग झाला सुकर!

News Desk

आरक्षण द्या नाही तर पुन्हा आंदोलन पेटणार

swarit

“पोकळ आश्वासनांचा धंदा असता, तर मुख्यमंत्र्यांचे जगभर कारखाने असते”, निलेश राणेंचा प्रहार

News Desk