HW News Marathi
महाराष्ट्र

“….म्हणूनच केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेसाठी” मुख्यमंत्र्यांनी दीपक पांडेंची केली होती निवड!

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर मात्र राणे यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर, केंद्रीय मंत्र्याला अटक होत नाही आणि अटक करायला मी काय सामान्य माणूस आहे का ? हे विधान चांगलंच चर्चेत आलं होतं.केंद्रीय मंत्री मंत्री नारायण राणे यांसह भाजपच्या बहुतांश नेत्यांचे दोन मोठे गैरसमज महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी दूर केले. यामागे दोन व्यक्ती आहेत. माध्यमांत उघडपणे दिसणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पडद्यामागे हे अशक्य शक्य करणारे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे. म्हणून आता केंद्रीय मंत्र्याला अटक झाल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

मात्र कारवाई कोण करणार ?

केंद्रीय मंत्र्याला अटक झाली , ही मंगळवारची राष्ट्रीय स्तरावर चर्चेची बातमी होती. मात्र हे अशक्य शक्य करून दाखविण्याचा संदेश नाशिक शहरातून गेला आहे. त्यामागे पोलिस आयुक्त दीपक पांडे ही व्यक्ती आहे. राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असभ्य भाषेचा वापर सुरु केल्यावर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असा आग्रही विचार सरकारमधील शिवसेनेत होता. त्यावर प्रचंड खल झाला. रात्रभर चर्चा चर्वणानंतर त्याला होकार मिळाला. मात्र कारवाई कोण करणार ? राज्यातील बहुतांश पोलिस आयुक्त , जिल्हा पोलिस प्रमुखांनी लांब राहणेच पसंत केले. मात्र पांडे यांनी यातील तरतुदींचा बारीक अभ्यास करून मार्ग दाखवला. कारवाई आधी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर अर्थात शहरातील जबाबदार व्यक्ती म्हणून तक्रार घेण्यात आली. शिवसेनेच्या अन्य मोठ्या नेत्यांचे जबाब नोंदविण्यात आले. आणि भा.द. वि . कलम ५०० व अन्य कलमांचा आधार घेतला.

व्यक्तीगत उद्धव ठाकरे नव्हे तर मुख्यमंत्री या घटनात्मक पदाबाबत नारायण राणे यांचे वक्तव्य दूरचित्रवाहिनीवर ऐकले. त्यामुळे सायबर क्राईम शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय मंत्र्याला अटकेपासून संरक्षण नाही. फक्त अटके नंतर त्याची माहिती उपराष्ट्रपतींना देणे, हे बंधन आहे. ही तरतूद आमदारांबाबत देखील आहे. त्यामुळे पांडे यांनी या प्रकरणाचा छडा लावून धरला होता मात्र यापूर्वी केंद्रीय मंत्र्याला अटक झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा”

News Desk

आयुष्यात माझी एकच इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणे नितीन गडकरी

News Desk

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, अजित पवारांचे आवाहन

News Desk