अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज (५ फेब्रुवारी) सातवा दिवस आहे. राज्य सरकारने अण्णांच्या उपोषणाची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिह आज दुपारी २ वाजताच्या सुमारास राळेगणसिद्धी येथे दाखल होणार आहेत.
यापूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र अण्णा उपोषणावर ठाम आहेत. अण्णांच्या उपोषणाचा सातवा दिवस असल्याने सरकारच्या निषेधार्थ राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी चूल बंद ठेऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. जनावरेही आंदोलनस्थळी आणून बांधली आहेत. शेतक-यांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाग यावी, यासाठी जनावरांनाही आज आंदोलनस्थळी आणण्यात आले आहे. माजी सैनिकही आंदोलनात सहभागी झाले आहेत.
लोकपाल कायदा होऊन पाच वर्षे झाली तरीही गेल्या पाच वर्षांत लोकपाल नियुक्ती झाली नाही. सर्वोच्च न्यायालयाने तीनदा सरकारला फटकारले. २८ फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी असल्याचे सरकार सांगत आहे. मग २८ फेब्रुवारीपर्यंत उपोषण सुरू ठेवतो, असा टोला अण्णांनी सरकारला लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.