HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात १७ कोटींची मद्यविक्री, उत्पादन शुल्क आयुक्‍तांचा अंदाज

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भावा वेगाने वाढ आहेत. रेड झोनमधील कंटेंटमेंट राज्यातील अन्य जिल्ह्यात मद्यविक्रीला ४ मे रोजी सरकारने परवानगी दिली होती. महाराष्ट्रात रोज २४ लाख लिटर मद्याची विक्री होते, अशी अधिकृत माहिती राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्‍त कांतिलाल उमप यांनी काल (५ मे) दिली आहे. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर मद्यप्रेमींनी तब्बल ४२ ते ४३ दिवसांनी दारुविक्री सुरू झाल्यानंतर सोमवारी १७ कोटी रुपयांची दारू विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वर्षभरात राज्यात ८६.७ कोटी लिटर दारू विक्री होते, त्यात सर्वाधिक ३५ कोटी लिटर देशी दारूची विक्री होते. तर विदेशी दारू २० कोटी लिटर इतकी विकली जाते. बीअर ३१ कोटी लिटर इतकी विकली जाते. तर वाईन मात्र सर्वात कमी म्हणजे ७० लाख लिटर विकली जाते. दिल्ली सरकारने कालपासून (५ मे) दारू विक्रीवर ७० टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याला ‘स्पेशल कोरोना फी’ असे नाव देण्यात आले आहे.

एकट्या उत्तर प्रदेशमध्ये जवळपास ४ कोटी ७३ लाख ८४ हजार ३३० रुपयांची मद्यविक्री झाली होती. यात देसी दारू ६० लाख २५ हजार ५००, इंग्लिश दारू ३ कोटी ८९ लाख ८५ हजार ८०० रुपये आणि बिअर २३ लाख ७३ हजार ३० रुपये विकली गेली. तब्बल ८८ हजार लोकांनी मद्य खरेदी केली आहे. महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ७५ जिल्ह्यात ७५ दारुच्या विक्रीने संपूर्ण राज्याचे विक्रीचा अनुमान लावू शकतो.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ६,०५९ नवे रुग्ण आढळले

News Desk

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण 

News Desk

अमिताभजींना कोरोना,राजभवनात कोरोना ..आता तरी परिक्षांबाबत निर्णय घ्या !

News Desk