HW News Marathi
Covid-19

राज्यात ७९० नवीन रुग्णांचे निदान, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली

मुंबई | राज्यात काल १२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २००० रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत ७९० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर एकूण ९७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (२ मे) दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ६१ हजार ९२ नमुन्यांपैकी १ लाख ४८ हजार २४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १२ हजार २९६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

काल राज्यात ३६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५२१ आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुणे शहरातील ३, अमरावती शहरातील २, तर वसई विरार मधील १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे. याशिवाय प. बंगालमधील एका जणाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २८ पुरुष तर ८ महिला आहेत. काल झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ३ जणांची इतर आजाराबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये (७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या

  • मुंबई : ८३५९ (३२२)
  • ठाणे: ५७ (२)
  • ठाणे मनपा: ४६७ (७)
  • नवी मुंबई मनपा: २०४ (३)
  • कल्याण डोंबिवली मनपा: १९५ (३)
  • उल्हासनगर मनपा: ४
  • भिवंडी निजामपूर मनपा: २० (१)
  • मीरा भाईंदर मनपा: १३९ (२)
  • पालघर: ४४ (१)
  • वसई विरार मनपा: १४४ (४)
  • रायगड: २७ (१)
  • पनवेल मनपा: ४९ (२)
  • ठाणे मंडळ एकूण: ९७०९ (३४८)
  • नाशिक: ८
  • नाशिक मनपा: ३५
  • मालेगाव मनपा: २१९ (१२)
  • अहमदनगर: २६ (२)
  • अहमदनगर मनपा: १६
  • धुळे: ८ (२)
  • धुळे मनपा: १९ (१)
  • जळगाव: ३४ (११)
  • जळगाव मनपा: १२ (१)
  • नंदूरबार: १२ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: ३८९ (३०)
  • पुणे:८० (४)
  • पुणे मनपा: ११८७ (९५)
  • पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
  • सोलापूर: ७
  • सोलापूर मनपा: १०८ (६)
  • सातारा: ३६ (२)
  • पुणे मंडळ एकूण: १४९० (११०)
  • कोल्हापूर: १०
  • कोल्हापूर मनपा: ६
  • सांगली: २९
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
  • सिंधुदुर्ग: ३ (१)
  • रत्नागिरी: १० (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ६० (३)
  • औरंगाबाद:५
  • औरंगाबाद मनपा: २१५ (९)
  • जालना: ८
  • हिंगोली: ३७
  • परभणी: १ (१)
  • परभणी मनपा: २
  • औरंगाबाद मंडळ एकूण: २६८ (१०)
  • लातूर: १२ (१)
  • उस्मानाबाद: ३
  • बीड: १
  • नांदेड: ०
  • नांदेड मनपा: ४
  • लातूर मंडळ एकूण: २० (२)
  • अकोला: १२ (१)
  • अकोला मनपा: ३७
  • अमरावती: ३ (१)
  • अमरावती मनपा: २८ (९)
  • यवतमाळ: ७९
  • बुलढाणा: २१ (१)
  • वाशिम: २
  • अकोला मंडळ एकूण: १८२ (१२)
  • नागपूर: ६
  • नागपूर मनपा: १४० (२)
  • भंडारा: १
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर मनपा: ३
  • गडचिरोली: ०
  • नागपूर मंडळ एकूण: १५१ (२)
  • इतर राज्ये: २७ (४)

एकूण: १२ हजार २९६ (५२१)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या बांधकाम व्यवसायबाबत शरद पवारांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र

News Desk

विधानपरिषदेची उमेदवारी डावल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले

News Desk

मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे ! मृत्यूदर ५.५ टक्क्य़ांवर पोहोचला 

News Desk