HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ६७८ नवीन रुग्णांचे निदान, एकूण कोरोना बाधितांची संख्या १२ हजार ९७४ वर

मुंबई। राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २११५ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (३ मे) दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७० हजार १३९ नमुन्यांपैकी १ लाख ५६ हजार ७८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ८१ हजार ३८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५४८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २१, पुण्यातील ४, भिवंडीतील १, नवी मुंबईमधील १ मृत्यू आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ११ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी १३ जणांमध्ये ( ४८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या

  • मुंबई : ८८०० (३४३)
  • ठाणे: ६० (२)
  • ठाणे मनपा: ४८८ (७)
  • नवी मुंबई मनपा: २१६ (४)
  • कल्याण डोंबिवली मनपा: २१२ (३)
  • उल्हासनगर मनपा: ४
  • भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
  • मीरा भाईंदर मनपा: १४१ (२)
  • पालघर: ४४ (१)

    वसई विरार मनपा: १५२ (४)

  • रायगड: ३० (१)
  • पनवेल मनपा: ५५ (२)
  • ठाणे मंडळ एकूण: १०,२२३ (३७१)
  • नाशिक: १२
  • नाशिक मनपा: ४३
  • मालेगाव मनपा: २२९ (१२)
  • अहमदनगर: २७ (२)
  • अहमदनगर मनपा: १६
  • धुळे: ८ (२)
  • धुळे मनपा: २० (१)
  • जळगाव: ३४ (११)
  • जळगाव मनपा: १२ (१)
  • नंदूरबार: १२ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: ४१३ (३०)
  • पुणे: ८१ (४)
  • पुणे मनपा: १२४३ (९९)
  • पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
  • सोलापूर: ७
  • सोलापूर मनपा: १०९ (६)
  • सातारा: ३७ (२)
  • पुणे मंडळ एकूण: १५४९ (११४)
  • कोल्हापूर: १०
  • कोल्हापूर मनपा: ६
  • सांगली: २९
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
  • सिंधुदुर्ग: ३ (१)
  • रत्नागिरी: ११ (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ६१ (३)
  • औरंगाबाद:५
  • औरंगाबाद मनपा: २३९ (९)
  • जालना: ८
  • हिंगोली: ४२
  • परभणी: १ (१)
  • परभणी मनपा: २
  • औरंगाबाद मंडळ एकूण: २९७ (१०)
  • लातूर: १२ (१)
  • उस्मानाबाद: ३
  • बीड: १
  • नांदेड मनपा: ३१ (१)
  • लातूर मंडळ एकूण: ४७ (२)
  • अकोला: १२ (१)
  • अकोला मनपा: ५०
  • अमरावती: ३ (१)
  • अमरावती मनपा: ३१ (९)
  • यवतमाळ: ७९
  • बुलढाणा: २१ (१)
  • वाशिम: २
  • अकोला मंडळ एकूण: १९८ (१२)
  • नागपूर: ६
  • नागपूर मनपा: १४६ (२)
  • भंडारा: १
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर मनपा: ४
  • नागपूर मंडळ एकूण: १५८ (२)
  • इतर राज्ये: २८ (४)

एकूण: १२ हजार ९७४ (५४८)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या १०३, तर प्रति दशलक्ष चाचण्यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

News Desk

राज्यात आज ४ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

रेल्वे मंत्रालयाने विशेष ट्रेनच्या तिकीट बुकिंगद्वारे केली ऐवढी कमाई

News Desk