मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१२ मे) दिली.
राज्यात आज 1026 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 24427 अशी झाली आहे. आज नवीन 339 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 5125 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 12, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५ नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २४ हजार ४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या आता ९२१ झाली आहे.आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २८, पुण्यात ६, पनवेल मध्ये ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३, ठाण्यात २, रायगडमध्ये १, औरंगाबाद शहरात १ आणि अकोला शहरात १ मृत्यू झाला आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये ( ६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा
- मुंबई : १४,९२४ (५५६)
- ठाणे: १४० (३)
- ठाणे मनपा: १००४ (११)
- नवी मुंबई मनपा: ९५५ (४)
- कल्याण डोंबिवली मनपा: ३८४ (३)
- उल्हासनगर मनपा: ५३
- भिवंडी निजामपूर मनपा: ३५ (२)
- मीरा भाईंदर मनपा: २४३ (२)
- पालघर: ३८ (२)
- वसई विरार मनपा: २६३ (१०)
- रायगड: १२९ (२)
- पनवेल मनपा: १४६ (८)
- ठाणे मंडळ एकूण: १८,३३७ (६०३)
- नाशिक: ८२
- नाशिक मनपा: ४३
- मालेगाव मनपा: ६१६ (३४)
- अहमदनगर: ५४ (३)
- अहमदनगर मनपा: १०
- धुळे: ९ (३)
- धुळे मनपा: ५४ (३)
- जळगाव: १५२ (१५)
- जळगाव मनपा: ४० (९)
- नंदूरबार: २२ (२)
- नाशिक मंडळ एकूण: १०८२ (६९)
- पुणे: १६७ (५)
- पुणे मनपा: २६२१ (१५५)
- पिंपरी चिंचवड मनपा: १४९ (४)
- सोलापूर: ९
- सोलापूर मनपा: ३०८ (१९)
- सातारा: १२३ (२)
- पुणे मंडळ एकूण: ३३७७ (१८५)
- कोल्हापूर: १३ (१)
- कोल्हापूर मनपा: ६
- सांगली: ३४
- सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)
- सिंधुदुर्ग: ६
- रत्नागिरी: ५५ (२)
- कोल्हापूर मंडळ एकूण: ११८ (४)
- औरंगाबाद:९४
- औरंगाबाद मनपा: ५५९ (१५)
- जालना: १६
- हिंगोली: ६१
- परभणी: १ (१)
- परभणी मनपा: १
- औरंगाबाद मंडळ एकूण: ७३२ (१६)
- लातूर: २६ (१)
- लातूर मनपा: ५
- उस्मानाबाद: ४
- बीड: १
- नांदेड: ४
- नांदेड मनपा: ४२ (४)
- लातूर मंडळ एकूण: ८२ (५)
- अकोला: १८ (१)
- अकोला मनपा: १५१ (११)
- अमरावती: ५ (२)
- अमरावती मनपा: ८४ (११)
- यवतमाळ: ९८
- बुलढाणा: २५ (१)
- वाशिम: २
- अकोला मंडळ एकूण: ३८३ (२६)
- नागपूर: २
- नागपूर मनपा: २६६ (२)
- वर्धा: १ (१)
- भंडारा: १
- गोंदिया: १
- चंद्रपूर: १
- चंद्रपूर मनपा: ३
- नागपूर मंडळ एकूण: २७५ (३)
- इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २४ हजार ४२७ (९२१)
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.