HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोना बाधित ११८८ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण संख्या ८०६८ वर

मुंबई | आज राज्यात कोरोनाबाधीत ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. आज ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. असून आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२६ एप्रिल) दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये

असून ९१६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुणे महानगरपालिका येथे ३, जळगाव येथे २, सोलापूर शहरात १, तर लातूर येथे १ मृत्यू

झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या

  • मुंबई – ५४०७ (२०४)
  • ठाणे – ७३८ (१४)
  • पालघर – १४१ (४)
  • रायगड – ५७ (१)
  • मुंबई मंडळ – ६३४३ (२२३)
  • नाशिक – १३१ (१२)
  • अहमदनगर – ३६ (२)
  • धुळे – २५ (३)
  • जळगाव – १९ (४)
  • नंदूरबार – ११ (१)
  • नाशिक मंडळ – २२२ (२२),
  • पुणे – १०५२ (७६)
  • सोलापूर – ४७ (५)
  • सातारा – २९ (२)
  • पुणे मंडळ – ११२८ (८३),
  • कोल्हापूर – १०
  • सांगली – २७ (१)
  • सिंधुदुर्ग – १
  • रत्नागिरी – ८ (१)
  • कोल्हापूर मंडळ – ४६ (२)
  • औरंगाबाद – ५० (५)
  • जालना – २
  • हिंगोली – ८
  • परभणी – १
  • औरंगाबाद मंडळ- ६१ (५)
  • लातूर – ९ (१)
  • उस्मानाबाद – ३
  • बीड – १
  • नांदेड – १
  • लातूर मंडळ – १४ (१),
  • अकोला – २९ (१)
  • अमरावती – २० (१)
  • यवतमाळ – ४८
  • बुलढाणा – २१ (१)
  • वाशिम – १
  • अकोला मंडळ – ११९ (३)
  • नागपूर – १०७ (१)
  • गोंदिया – १
  • चंद्रपूर – २
  • नागपूर मंडळ – ११० (१)
  • इतर राज्ये – २५ (२)

एकूण – ८०६८ (३४२).

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट

News Desk

निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना ३ महिन्यांचे अनुदान आगाऊ मिळणार

News Desk

HW Exclusive | ‘हे’ असेल पर्यटन क्षेत्रापुढचे सर्वात मोठे आव्हान

News Desk