HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोना बाधित १५९३ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण संख्या ९९१५ वर

मुंबई | राज्यात काल कोरोना बाधित ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ९९१५ झाली आहे. काल २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ७८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (२९ एप्रिल) दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ३७ हजार १५९ नमुन्यांपैकी १ लाख २६ हजार ३७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ९९१५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६२ हजार ८६० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ८१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

काल राज्यात ३२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४३२ झाली आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे २६, तर पुणे शहरातील ३ आहेत. या शिवाय सोलापूर शहरात १, औरंगाबाद शहरात १ आणि पनवेल शहरात १ मृत्यू झाला आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ३२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची संख्या

  • मुंबई : ६६४४ (२७०)
  • ठाणे: ४६ (२)
  • ठाणे मनपा: ३७३ (४)
  • नवी मुंबई मनपा: १६२ (३)
  • कल्याण डोंबिवली मनपा: १५८ (३)
  • उल्हासनगर मनपा: ३
  • भिवंडी निजामपूर मनपा: १५
  • मीरा भाईंदर मनपा: १२५ (२)
  • पालघर: ४१ (१)
  • वसई विरार मनपा: १२८ (३)
  • रायगड: २३
  • पनवेल मनपा: ४६ (२)
  • ठाणे मंडळ एकूण: ७७६४ (२९०)
  • नाशिक: ५
  • नाशिक मनपा: १९
  • मालेगाव मनपा: १७१ (१२)
  • अहमदनगर: २६ (२)
  • अहमदनगर मनपा: १६
  • धुळे: ८(२)
  • धुळे मनपा: १७ (१)
  • जळगाव: ३० (८)
  • जळगाव मनपा: १० (१)
  • नंदूरबार: ११ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: ३१३ (२७)
  • पुणे:५८ (३)
  • पुणे मनपा: १०६२ (७९)
  • पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
  • सोलापूर: ७
  • सोलापूर मनपा: ७८ (६)
  • सातारा: ३२ (२)
  • पुणे मंडळ एकूण: १३०९ (९३)
  • कोल्हापूर: ७
  • कोल्हापूर मनपा: ५
  • सांगली: २८
  • सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
  • सिंधुदुर्ग: २
  • रत्नागिरी: ८ (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ५१ (२)
  • औरंगाबाद:२
  • औरंगाबाद मनपा: १०३ (७६)
  • जालना: २
  • हिंगोली: १५
  • परभणी मनपा: १
  • औरंगाबाद मंडळ एकूण: १२३ (७)
  • लातूर: १२ (१)
  • उस्मानाबाद: ३
  • बीड: १
  • नांदेड मनपा: ३
  • लातूर मंडळ एकूण: १९ (१)
  • अकोला: १२ (१)
  • अकोला मनपा: २७
  • अमरावती: २
  • अमरावती मनपा: २६ (७)
  • यवतमाळ: ७९
  • बुलढाणा: २१ (१)
  • वाशिम: २
  • अकोला मंडळ एकूण: १६९ (९)
  • नागपूर: ६
  • नागपूर मनपा: १३२ (१)
  • भंडारा: १
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर मनपा: २
  • नागपूर मंडळ एकूण: १४२ (१)
  • इतर राज्ये: २५ (२)

एकूण: ९९१५ (४३२)

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरे म्हणतात…

News Desk

“हा बिघाड अपेक्षित होता कि अनपेक्षित ? गाफिलपणा झालाय का ?” | मुख्यमंत्री

News Desk

कोरोना रोखण्यासाठी समन्वयाने काम करा,अजित पवारांचे पुण्यात निर्देश!

Arati More