HW News Marathi
महाराष्ट्र

जयकुमार गोरे हटावण्याची माण- खटावमधील सर्वपक्षीयांची मागणी 

माण-खटाव | कॉंग्रसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत दुप्पट मतांनी पराभव करण्याचा जंग सर्वपक्षीय बैठकीत बांधण्यात आला आहे. गोरे यांचे माण-खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करतात, असा आरोप करत हा जंग बांधण्यात आल्याचे समोर आले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा पराभव करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान गोरे यांचे माण खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करत असून आमचे आता ठरले. गोरे यांचा दुप्पट मतांनी पराभव करणार, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

या बैठकीत भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख रासपचे जिल्हाध्यक्ष मामू शेठ विरकर, डॉ. संदीप पोळ, वडूजचे नगरसेवक अनिल माळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी परिषदेसाठी काँग्रेसचे नाना पटोले जाणार पवारांच्या बारामतीत!

News Desk

तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध, अजित पवार यांची ग्वाही

Aprna

…म्हणून मुख्यमंत्री विधानपरिषदेवर जाणार

swarit