मुंबई – घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये असे चोख प्रत्युत्तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप खासदार किरीट सोमय्या यांना दिले आहे. शिवसेनेकडून नगरसेकांचा घोडेबाजार केला जात आहे. त्यासाठी तीन कोटी दिले जात आहेत असा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याचा चांगलाच समाचार उद्धव यांनी घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजप आम्हाला जर मित्रपक्ष मानत असेल तर आमचा पक्ष वाढतो तर त्यांच्या पोटात कशाला दुखायला हवय. त्यांना आनंद झाला पाहीजे. जर त्यांना दुख होत असेल तर मग ते मित्र कसले असा टोलाही त्यांनी लगावला. शिवाय किरीट यांनी उद्धव यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना उद्धट असे म्हटले होते. त्याचालाही उद्धव यांनी उत्तर दिले. काहींवर लहान पणा पासून आई वडीलांचे संस्कार असतात तेच संस्कार त्यांच्यावर झाल्याचा टोला त्यांनी किरीट यांना लगावला. दरम्यान शिवसेना एका दिवसात एवढे काही करू शकतो त्यावरून शिवसेनेची ताकद ओळखून जावी असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.
उद्धव ठाकरेंनी केलं अशोक चव्हाणांचे कौतूक
नांदेडच्या निवडणूकीतील यश हे काँग्रेस आणि अशोक चव्हाणांचे यश आहे. त्यामुळे आपण त्यांचे अभिनंदन करतो असे उद्धव यांनी सांगितले. या निकालावरून मोदी लाट पूर्ण ओसरली असल्याचे दिसून येते. शिवाय हे परतीची चिन्ह दिसत असल्याचेही त्यांनी सांगत भाजपला डिवचले. ३ वर्षातच एखाद्या पक्षावर ही वेळ आली ही भाजपला विचार करण्याची गोष्ठ आहे. नांदेड महापालिकेत भाजपने फोडाफोड करून उमेदवार जूळवले होते. ८० पैकी ४० उमेदवार हे अन्य पक्षातून फोडले होते ही ही त्यांनी आवर्जून सांगितले. मात्र भाजपच्या अमिषाना नांदेडची जनता भूलली नाही हेही ते सांगायला विसरले नाहीत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.