HW News Marathi
महाराष्ट्र

मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा १६ फुटांवर

कराड। मुसळधार पावसामुळे बुधवारी (८ऑगस्ट) पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे सकाळी अकरा वाजता १६ फुटांवरून १४ फुटापर्यंत कमी करण्यात आले. मात्र पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळी साडेसहा वाजता पुन्हा एकदा धरणाचे दरवाजे उघडून १६ फुटांवर नेण्यात आले आहेत. त्यामुळेच कोयना नदीत धरणातून प्रतिसेकंद १ लाख २३ हजार ८२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्‍यामुळे कोयनेसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, महापुराच्या धोक्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोयना धरणाचे दरवाजे मंगळवारी (६ ऑगस्ट) दुपारी चार वाजता साडेचौदा फुटांवरून दीड फुटाने वाढवत १६ फुटांवर नेण्यात आले होते. त्यानंतर सुमारे १५ तास धरणाचे दरवाजे स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र, दरम्यानच्या कालावधीत जोरदार पावसाचा जोर ओसरल्याने बुधवारी सकाळी ( ७ऑगस्ट) वाजता धरणाचे दरवाजे सकाळी ११ वाजता दोन फुटांनी कमी करून ते चौदा फुटांवर नेण्यात आले होते.

त्यामुळे १ लाख ६ हजार ९९० क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग वक्री दरवाजातून तर पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणाचे दरवाजे कमी करण्यात आल्याने, पुराचे पाणी चार फुटाने कमी झाल्याने आणि पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने कराडसह नदीकाठच्या गावातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून नारायण राणेंनी भाजपमध्ये पळ काढला, शिवसेनेच्या आमदाराचा गौप्यस्फोट

News Desk

न्यायालयीन आदेशाचा आदर राखून पवना प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाची कार्यवाही! – शंभूराज देसाई

Aprna

संभाजीराजेंची खासदार निधीतून पूरग्रस्तांना ५ कोटींची मदत

News Desk