HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचाच खरा चेहरा उघड झाला व तो संपूर्ण देशाने पाहिला !

मुंबई। शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर महाराष्ट्र भाजपने संशोधन सुरू केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुरातत्व विभागाचे उत्खनन म्हणणे सोयीचे ठरेल. 2014 मध्ये शिवसेनेने काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिल्याचा ‘स्फोट’ काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्याआधारे हे उत्खनन सुरू झाले आहे. श्री. चव्हाण यांचे म्हणणे असे की, 2014 साली विशिष्ट राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आघाडी स्थापन करण्याचा शिवसेनेचा विचार होता. त्यादृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याशी संपर्क साधला होता. आपण तो प्रस्ताव फेटाळला. चव्हाण यांच्या या दाव्याने फारशी खळखळ किंवा खळबळ होण्याचे कारण नव्हते. चव्हाणांचा दावा मुंबईतील सौम्य थंड हवेत वाहून गेला. शिवसेनेने किंवा राष्ट्रवादीने यावर गांभीर्याने मत व्यक्त केल्याचे दिसत नाही; पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा इतका गांभीर्याने घेतला की, दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत विझलेली चिलीम फुंकण्याचा ते प्रयत्न करीत होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर उभे राहून त्यांनी सांगितले, ”हे अत्यंत आश्चर्यकारक आहे व पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असून त्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे!” श्री. चव्हाण काय बोलले त्यात आम्हाला पडायचे नाही; पण यानिमित्ताने भाजप आपला चेहरा स्वतःच ओरबाडीत आहे. सामनाच्या संपादकीय मधून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे

सामनाचा आजचा अग्रलेख

2014 सालचीच शिवसेना आजही आहे . भाजपला ‘105’ असूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली . कारण भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत . बोलायचे एक व करायचे दुसरेच . हे 2019 सालीही झाले . त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरूमहाराजांनी प्रयत्न केले तरी शरद पवारांनी भाजपची कुरघोडी होऊ दिली नाही . अर्थात सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. 2014साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपटय़ाचीही किंमत नव्हती . याचा अभ्यास श्री . फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वतःच्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही .

शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर महाराष्ट्र भाजपने संशोधन सुरू केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुरातत्व विभागाचे उत्खनन म्हणणे सोयीचे ठरेल. 2014 मध्ये शिवसेनेने काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिल्याचा ‘स्फोट’ काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्याआधारे हे उत्खनन सुरू झाले आहे. श्री. चव्हाण यांचे म्हणणे असे की, 2014 साली विशिष्ट राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आघाडी स्थापन करण्याचा शिवसेनेचा विचार होता. त्यादृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याशी संपर्क साधला होता. आपण तो प्रस्ताव फेटाळला. चव्हाण यांच्या या दाव्याने फारशी खळखळ किंवा खळबळ होण्याचे कारण नव्हते. चव्हाणांचा दावा मुंबईतील सौम्य थंड हवेत वाहून गेला. शिवसेनेने किंवा राष्ट्रवादीने यावर गांभीर्याने मत व्यक्त केल्याचे दिसत नाही; पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा इतका गांभीर्याने घेतला की, दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत विझलेली चिलीम फुंकण्याचा ते प्रयत्न करीत होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर उभे राहून त्यांनी सांगितले, ”हे अत्यंत आश्चर्यकारक आहे व पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असून त्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे!” श्री. चव्हाण काय बोलले त्यात आम्हाला पडायचे नाही; पण यानिमित्ताने भाजप आपला चेहरा स्वतःच ओरबाडीत आहे. खरेतर 2014 साली भाजपचाच खरा चेहरा उघड झाला व तो संपूर्ण देशाने पाहिला. पृथ्वीराज चव्हाण जे सांगतात त्यात

लॉजिक नावाचा प्रकार

अजिबात नाही हे आधी मान्य केले पाहिजे. 2014 साली हिंदुत्व, हिंदू मतांचे विभाजन आणि 25 वर्षांचे नाते यांचा विचार न करता अत्यंत निर्घृण पद्धतीने भाजपने शिवसेनेशी युती तोडली. त्यांचे हिंदुत्व वगैरे ढोंग ठरले. हा भाजपचा पहिला मुखवटा उतरला, पण त्यानंतरही खरा चेहरा बाहेर आला नाही. कारण एका मुखवटय़ावर त्यांचे भागत नाही. 2014 सालात भाजप-शिवसेना वेगळे लढले तसे काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळे लढले. चौरंगी लढतीत भाजप 122 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. शिवसेनेने स्वबळावर

63 जागा घेतल्या. काँग्रेस 42 तर राष्ट्रवादी 41 जागांवर थांबले. म्हणजे विधानसभा त्रिशंकूच ठरली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला व सत्ताधारी काँग्रेस थेट तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. त्यामुळे काँग्रेसला त्यावेळी ‘आवाज’ नव्हता. चव्हाण यांच्याकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. शिवसेना विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होती व भाजप पुन्हा हिंदुत्व वगैरे नात्यांची जाळी फेकू लागला होता. सरकार स्थापनेचे घोंगडे लटकलेच होते. त्यावेळी ध्यानीमनी नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल पुढे आले व त्यांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. येथे भाजपचा दुसरा मुखवटा गळून पडला. म्हणजे हे सर्व आधीच ठरले होते असे म्हणायला हरकत नाही. 2014 साली हे नाटय़ घडत असताना शिवसेनेने चेहरा लपवलेला नव्हता. शिवसेना उजळ माथ्याने वावरत होती.

मुखवटय़ाचे कारखाने

भाजपकडेच होते. ‘लॉजिक’ म्हणाल तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने आजच्याप्रमाणे एकत्र यावे असे जबरदस्तीने ठरवले असते तरी ‘आकडा’ जमत नव्हता. मारून मुटकून 149 चा आकडा होता व तो धोकादायक होता. ते काठावरचे बहुमत होते व घोडेबाजारात मशहूर असलेले भाजपवाले साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून तोडफोड करायला तयार होते. श्री. फडणवीस यांनी आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. 2014 साली राष्ट्रवादीने भाजपला उघड पाठिंबा दिला व त्यामागे गुरूमहाराजांची इच्छा व दिशा होती. हे सत्य स्वीकारले तर शिवसेनेच्या चेहऱ्यावर ओरखडे मारण्यापेक्षा भाजपने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहणे गरजेचे आहे. 2014 सालचीच शिवसेना आजही आहे. भाजपला ‘105’ असूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. कारण भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच. हे 2019 सालीही झाले. त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरूमहाराजांनी प्रयत्न केले तरी शरद पवारांनी भाजपची कुरघोडी यावेळी होऊ दिली नाही. अर्थात सोनिया गांधी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. 2014 साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपटय़ाचीही किंमत नव्हती. याचा अभ्यास श्री. फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वतःच्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुत्री, मांजरं, कोंबड्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाही; अजित पवारांनी सर्वांना खडेबोल सुनावले

Aprna

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज – आठवले

News Desk

रोहित पवारांवर निवडणुक आयोगाने कारवाई करावी, माजी आमदाराची मागणी!

News Desk