HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यभर पर्यटन पर्व मोठ्या उत्साहात

मुंबई | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यूएनडब्ल्यूटीओसह (युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑरगनायझेशन) २७ सप्टेंबर २०१८ हा जागतिक पर्यटन दिन साजरा करत आहे. पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन यांचा प्रचार करणे हे या वर्षीचे उद्दिष्ट आहे. आद्ययावत डिजिटल तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि ट्रॅव्हल व टुरिझम क्षेत्रातील उद्योजकतेमध्ये गुंतवणूक करण्याच्या आवश्यकतेवर भर देणे हा त्याचा हेतू आहे. मंचावरील नामांकीत वक्ते एसटीएएएचचे व्यवस्थापकीय संचालक तरुण जौकानी यांनी तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल त्यांचे मत व विचार व्यक्त केले आणि बोहरी किचनचे सीईओ श्री मुनाफ कपाडिया यांनी अनुभवात्मक पर्यटन, विशेषतः घरगुती जेवणामुळे राज्यातील पर्यटन संभाव्यतेला कसे प्रोत्साहन मिळेल यावर जोर दिला.

डिजिटल क्षेत्रातील जगभरातील ट्रेंड्स आणि प्रगती यांचा विचार करता त्या दृष्टीने सज्ज राहण्यासाठी एमटीडीसीतर्फे फेसबुक, यूट्युब आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून सातत्याने कंटेन्ट, सर्च इंजिन प्लॅन आणि ऑनलाइन डेस्टिनेशन प्रमोशनवर भर देत ऑनलाइन गुडविल विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. फॉलोअर्सना प्रतिबद्ध करणे, त्यांना विविध योजनांची माहिती देणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे, १६ सप्टेंबर २०१८ ते २७ सप्टेंबर २०१८ या काळात राज्यभर पर्यटन पर्व साजरे करण्यात आले. हॉटेलचालक, रिसॉर्ट ऑपरेटर, सहल आयोजक आणि इतर संबंधित व्यवसायांमधील भागधारकांनी राज्यातील पर्यटन क्षेत्राला सहकार्य करावे यासाठी त्यांना या क्षेत्राचे महत्त्व पटवून देणे ही यामागची संकल्पना आहे.

त्याचप्रमाणे जागतिक पर्यटन दिन खऱ्या अर्थाने साजरा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनशी संलग्न असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा कॅम्पेन’ची घोषणा केली. हे अभियान १५ सप्टेंबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि रत्नागिरी येथे राबविण्यात येणार आहे.

या प्रसंगी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे सन्माननीय पर्यटन (आणि रोहयो) मंत्री जयकुमार रावल म्हणाले, “पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन या मध्यवर्ती संकल्पनेसह जागतिक पर्यटन दिन साजरा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. जगभरात होणारे डिजिटल परिवर्तन स्वीकारणे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध प्रकारच्या लोकसंख्येशी आणि भूभागांतील पर्यटकांशी संवाद साधण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचा वापर करून जगभरातील पर्यटकांशी जोडले जाण्यास आणि त्यांना माहिती देण्यास मोलाची मदत होते. अलीकडच्या काळात एअरबीएनबी, एतिहाद, जेट एअरवेज आणि ओला यांच्याशी केलेल्या सहयोगामुळे पर्यटकांच्या वाढत्या मागण्यांची पूर्तता करणे आम्हाला शक्य झाले आहे आणि आधीच्या आव्हानांवर आम्ही मात करू शकलो आहोत. डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून पर्यटकांना उत्तम अनुभव प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम (आयएएस) म्हणाले, “जागतिक पर्यटन दिन २०१८ ही संकल्पना जगभरातील पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन अधोरेखित करते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किफायतशीर आहे आणि विविध भागधारकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाता येते आणि या माध्यमांची दृश्यमानताही अधिक आहे. टेक-सॅव्ही पर्यटकांसाठी इंटरॅक्टिव्ह वेबसाइट आणि सोशल मीडिया विकसित करण्यात आहे. या माध्यमातून एका क्लिकवर त्यांना आवश्यक माहिती उपलब्ध होईल.”

या वेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे (आयएएस) म्हणाले, “पर्यटन क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आहे. पर्यटकांना प्रत्येक प्रवासामध्ये आता वेगळा अनुभव हवा असतो. जागतिक पर्यटन दिन २०१८ या दिवसाच्या निमित्ताने डिजिटल परिवर्तनाच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून पर्यटकांना एका क्लिकवर अधिक चांगला अनुभव मिळू शकेल. एमटीडीसी नेहमी काळाशी सुसंगत राहण्याचा आणि जेव्हा पर्यटक महाराष्ट्रात येतात, तेव्हा त्यांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभव उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी!

News Desk

उदयनराजे जिल्हा बॅंकेत आले आणि विचारला एकच प्रश्न…

News Desk

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, जीवितहानी नाही

News Desk