HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलं अर्थसंकल्प सादर होणार; शेतकरी, मध्यमवर्गीयांच्या वाटेला काय येणार?

मुंबई | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे राज्याचे अर्थमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस हे आज (9 मार्च) दुपारी 2 वाजता सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  तर मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. नुकतेच अवकाळी पावसाने तोडणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सभागृहात शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा, अशी मागणी केली. आणि त्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.

यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनात शहरातील मध्यमवर्गी, शेतकरी यांच्या वाटेला काय येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फडणवीसांचा अर्थसंकल्प हा महाअर्थसंकल्प असल्याचे म्हटले जात आहे. अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सचिव, उद्योग संघटना आणि मंत्री यांच्याशी चर्चा केली होती. तर शहरी भागासाठी विविध प्रकल्प, पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्र, शेकऱ्यांसाठी पॅकेज यासंदर्भात कोणत्या मोठ्या घोषणा माडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विरोधकांचे सभागृहात घोषणाबाजी

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सभागृहात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी विरोधकांनी सभागृहात केली. शेतकर्‍यांच्या जीवावर हे सरकार चालेल आहे. लाखाचा पोशिंदा संपतोय…याबाबत सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात जाब विचारला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्यावतीने सभागृहात मांडला मात्र तो नाकारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.

 

Related posts

शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करता येईल का याबाबत केंद्राशी बातचीत करणार 

News Desk

महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आयएचजीने सहकार्य करावे! – अमित देशमुख

Aprna

शेतकरी विरोधात ट्विट केल्याने कंगनावर कर्नाटकात FIR दाखल

News Desk