मुंबई | कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनाचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फोनवरुन मागणी केली होती. यानंतर पुण्यातून आज (७ मे) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार पहिल बस अहमदनगरला रवाना झाली. एमपीएससी समनव्य समिती महाराष्ट्र राज्य यांनी ट्विट करुन यासंबंधित माहिती दिली आहे. तसेच, मनसेचे नेते अमित ठाकरे आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांचे आभारही मानले आहेत.
#punestudents @yadravkar व #अमितठाकरे आज आपल्या प्रयत्नांनामुळे लालपरी विध्यार्थ्यांना घेऊन घरी चालली. आम्हास खात्री आहे पुण्यातील प्रत्येक विध्यार्थी जो पर्यंत जाणार नाही तो पर्यंत आपण नक्कीच पाठपुरावा करणार सलाम आपल्याला@abpmajhatv @TV9Marathi @mnsadhikrut @harshdudhe_MT #म pic.twitter.com/DIqD4UUlwK
— Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) May 7, 2020
“आपल्या प्रयत्नांनामुळे आज लालपरी विद्यार्थ्यांना घेऊन घरी चालली. आम्हास खात्री आहे पुण्यातील प्रत्येक विद्यार्थी जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत आपण नक्कीच पाठपुरावा करणार” असे ट्वीट एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य’ने केले आहे. अमित ठाकरे यांनी काल (६ मे) रात्री १० वाजता मुख्यमंत्र्यांना फोनवरू संपर्क करत पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्न मांडल्याची माहिती मिळली होती. पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना तात्काल घरी जाण्याची व्यवस्था करावी आणि बसची सोय करावी, अशी विनंतीही अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
मुंबई पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्ती अशा सर्वांना पुढील चार दिवसात आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत काल सकाळीच घोषणा केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.