इंदापूर | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, राज्यातील इंदापूरमध्ये एकही रुग्ण नसल्याने इंदापूरकरांना दिलासा मिळाला होता. तो दिलासा आज (२८ एप्रिल) कोरोनाने शिरकाव केला. इंदापूर तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण भिगवण परिसरात आढळला.
आज भिगवण स्टेशन परिसरातील एका महिला रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती येथे उपचारासाठी गेलेल्या या महिला रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णास पुण्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले होते. या महिलेची चाचणी अहवाल आल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान शेजारच्या बारामती तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला, मात्र इंदापूर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण नसल्याने दिलासा होता. त्यातच आजपर्यंत म्हणजे जवळपास १४ दिवस बारामती शहरात एकही कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नसल्याने बारामती कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच आज इंदापूरमध्ये कोरोनाने खाते उघडल्याने आता पुन्हा चिंतेचे काहूर निर्माण झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.