HW News Marathi
देश / विदेश

आज पाहा वर्षातील पहिले ‘छायाकल्प’ चंद्रग्रहण

मुंबई। नववर्षात पौष शाकंभरी पौर्णिमेला म्हणजे आज (१० जानेवारी) रात्री पहिले छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे. आज रात्री १०.३८वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर, १२.४० वाजता ८९ टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे. या वेळी मध्यरात्री २.४५ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडणार असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञांनी दिली आहे.

हे छायाकल्प चंद्रग्रहण विशेष चष्म्याऐवजी उघडया डोळ्यांनीदेखील पाहता येणार असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञांनी दिली आहे. पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसेल. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर पश्चिम भाग, आशिया, ऑस्ट्रेलिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व भाग येथून दिसेल, असेही खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय

चंद्र ग्रहणाचे तीन प्रकार असतात. पहिला पूर्ण चंद्र ग्रहण, दुसरे आंशिक चंद्र ग्रहण आणि तीसरे छायाकल्प चंद्र ग्रहण.

जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते तेव्हा चंद्रावर पडणारी सूर्य किरण थांबून जाते आणि त्यावर पृथ्वीची सावली पडू लागते. याला पूर्ण चंद्र ग्रहण असे म्हटतात. जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची काळी सावली पृथ्वीवर देखील पडत नाही तेव्हा त्याला छायाकल्प चंद्र ग्रहण म्हणतात. हे ग्रहण पूर्ण आणि आंशिक चंद्र ग्रहणापेक्षा कमजोर असते त्यामुळे स्पष्टपणे बघणे अवघड जाते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ताशी ३१० किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वेची चाचणी यशस्वी

News Desk

#Amritsar : लोकांचा उद्रेक, पोलिसांवर केली दगडफेक

Gauri Tilekar

दोन्ही राजे केंद्र सरकारच्या मिठाला जगल्यासारखं बोलले ! शिवसेनेचा बोचरा टोला

News Desk