HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

#CoronaVirus : राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिला रुग्ण

सिंधुदुर्ग | कोरोना प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात दोन जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू  झाला आहे. तसेच राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ही रुग्ण सापडला आहे. यासंदर्भातील माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज (२६ मार्च) पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी  सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका करोना बाधित रुग्णाचा सहवासित असून त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता, मात्र, त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही. सिंधुदुर्गाततील रुग्णांने १९ मार्च रोजी मंगळुरू एक्स्प्रेसने प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान कर्नाटकामधील कोरोनाग्रस्त रुग्णांशी संपर्क आल्याने त्यांना लागण झाल्याची माहिती मिळली आहे. सिंधुदुर्गातील पहिल्या कोरोना रुग्णाला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवल्याची माहिती जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

दरम्यान, मंगळुरू एक्सप्रेसच्या एस ३ डब्यात कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण होता. याबाबत मंगळुरू एक्सप्रेसमधून कोकण रेल्वेला कल्पना देण्यात आली होती असून रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याबाबत कळवले. आणि जिल्हा प्रशासनाने कणकवली रेल्वे स्टेशनवर त्यानुसार तपासणी केली. तपासणीनंतर कोरोनाबाधित रुग्णासोबत डब्यातून प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना होम क्वारंटाइनच्या सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती  मिळलाी.

 

 

 

Related posts

उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू !

News Desk

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती

News Desk

संकटकाळी स्त्री हि पुरुषापेक्षा जास्त नेटाने उभी राहते कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk