बेंगलुरु । भारतात कोरोनाचा पहिला बळी हा कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनामुळे ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकाचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु यांनी ट्वीट करुन या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती दिली आहे.भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या७३ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली.
The 76 year old man from Kalburgi who passed away & was a suspected #COVID19 patient has been Confirmed for #COVID19. The necessary contact tracing, isolation & other measures as per protocol are being carried out.
— B Sriramulu (@sriramulubjp) March 12, 2020
जगभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेकडून महारोगराईची घोषणा केली आहे. जगभरात जवळपास साडेचार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आता महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एक कोरोना बाधित रूग्ण आढळून असून ठाण्यातील रुग्ण फ्रान्सवरून तर मुंबईतील रुग्ण दुबईहून आला होता. या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशभरात असा आहे कोरोना आकडा
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांमध्ये केरळचा पहिला नंबर लागतो. केरळमध्ये आतापर्यंत १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात १४, उत्तर प्रदेशात १०, दिल्ली ६ आणि कर्नाटकात चौघांना कोरोनाची लागण झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.