HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण: साक्षीदारांनी दोन्ही आरोपींना ओळखले

मुंबई | सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात आता नवीन वळण आले आहे. दाभोळकर हत्ये प्रकरणात आज (२० मार्च) साक्षीदारांनी साक्ष दिली आहे. यामुळे गेल्या आठ वर्षापासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेले दाभोळकरांच्या मारेकरांना शिक्षा मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या साक्षीदारांनी दाभोळकरांचे मारेकरी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची ओळख पटली आहे. 

साक्षीदार म्हणाले, २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळच्या सुमारास दाभोळकरांवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी  एक पुरुष आणि महिला असे दोन सफाई कर्मचारी रस्ता साफ करण्याचे काम करत होते. तेव्हा दाभोळकर पुलावर चालत आले असताना अचानक सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आले. या दोघांनी दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या आणि शनिवार पेठेच्या दिशेने पळाले.” 

या प्रकरणाची सुनावणी पुण्यात विशेष न्यायालयात सुरू आहे. यात एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली असून या प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी झाली. आणि आता साक्षीदारांची आरोपींची ओळख पटवण्याची उर्वरित परेड २३ मार्चला होणार आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रसने नोटबंदी विरोधात थाळीनाद आंदोलन

News Desk

अकोला हे देशात दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल! – देवेंद्र फडणवीस

Aprna

माझ्या घरावर मोठा हल्ला, ही दुर्दैवी घटना; ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Aprna