HW News Marathi
महाराष्ट्र

चित्रपट, नाटक, संगीत समीक्षकांचाही सन्मान विचाराधीन! – अमित देशमुख

मुंबई। सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल (३१ मे) मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेदरम्यान विविध पुरस्कार घोषित करीत असतानाच चित्रपट, नाटक आणि संगीत यांचे समीक्षण करणाऱ्यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही यावेळी मंत्री देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील गायन आणि संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना दरवर्षी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो. सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार पं.हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायन आणि वादन यामध्ये प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककला क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास ‘विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो. सन 2019-20 या वर्षाचा पुरस्कार आतांबर शिरढोणकर यांना तर सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर करण्यात आला आहे. रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर’ यांच्या नावे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार दत्ता भगत यांना तर सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार सतिश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येतो. सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार लता शिलेदार ऊर्फ दिप्ती भोगले यांना तर सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार सुधीर ठाकुर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पाचही पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंत व्यक्तींना सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. नाटक या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी कुमार सोहोनी आणि सन 2020-21 साठी गंगाराम गवाणकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी पंडितकुमार सुरुसे आणि सन 2020-21 साठी कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शौनक अभिषेकी आणि सन 2020-21 साठी देवकी पंडित यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी सुभाष खरोटे आणि सन 2020-21 साठी ओमकार गुलवडी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन 2019-20 साठी मधु कांबीकर आणि सन 2020-21 साठी वसंत इंगळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. किर्तन/समाजप्रबोधन या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी ज्ञानेश्वर वाबळे आणि सन 2020-21 साठी गुरुबाबा औसेकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमाशा या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शिवाजी थोरात आणि सन 2020-21 साठी सुरेश काळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाहीरी या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शाहीर अवधुत विभूते आणि सन 2020-21 साठी दिवंगत शाहीर कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नृत्य या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शुभदा वराडकर आणि सन 2020-21 साठी जयश्री राजगोपालन यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोककला या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी सरला नांदुलेकर आणि सन 2020-21 साठी कमलबाई शिंदे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजन या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी मोहन मेश्राम आणि सन 2020-21 साठी गणपत मसगे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कलादान या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी अन्वर कुरेशी आणि सन 2020-21 साठी देवेंद्र दोडके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

काल जाहीर करण्यात आलेले पुरस्कार लवकरच सर्व पुरस्कारार्थींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतील असेही मंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एवढेही येऊ नका की आम्हालाच बाहेर पडावे लागेल !

News Desk

‘दुसऱ्यांकडे बोट दाखविताना स्वत:च्या पक्षाचा विचार करावा’, काँग्रेसचा शरद पवारांना सल्ला

News Desk

अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज भेटीची कल्पना नव्हती. संभाजीराजेंची माहिती

News Desk