HW News Marathi
Covid-19

पुण्यात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ‘या’ संस्थेच्या वसतीगृहाचा ताबा घेण्याचे न्यायालयाचे आदेश

पुणे। राज्यात मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. येत्या दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत पुण्याच्या जवळील लोणावळ्यातील समुद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज या संस्थेच्या वसतीगृहाचा ताबा घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे.

या इन्स्टिट्यूटमध्ये मरिन इंजिनिअरिंग आणि समुद्र अभ्यासाचे शिक्षण दिले जाते. कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेता, येत्या काही दिवसात या इमारतीचा ताबा देण्याची विनंती राज्य सरकारने केले आहे. मात्र, संस्थेने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख कारावासाची यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी घेण्यात आली आहे. कोरोनासारख्या संकट काळात नको ती कारणे देऊ नका, असे म्हणत न्यायालयाने संस्थेचे कान टोचले आहे.

या संस्थेच्या जागेचा वापर पिंपरी चिंचवडमधील कोविडच्या रुग्णांसाठी करण्यात येईल, तर ८ मे दरम्यान पुण्यातील रुग्णांची संख्या ६ हजार ४०० च्या जवळपास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संस्थेच्या इन्स्टिट्यूटचा ताब्यात घेण्याची तयारी सुरु आहे. यात १९२ खोल्या आणि ५१६ बेडची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये लॉकडाऊन लागू शकतो !, आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

News Desk

चिंता वाढली | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाखांच्या पार

News Desk

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ क्वारंटाईनमध्ये,पत्रकार परिषदेत होता कोरोना झालेला पत्रकार

Arati More