HW News Marathi
महाराष्ट्र

सुनील डिरवेंच्या हत्येनंतर यवतमाळमध्ये तणाव; ग्रामस्थांचे नागपूर-तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

मुंबई | शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील भांबराजा येथे घडली असून या पदाधिकाऱ्याचे नाव सुनील डिरवे यांची हत्या झाली आहे. डिरवे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत. डिरवेंची त्यांच्या राहत्या घरात घुसून तीन व्यक्तींनी त्यांची हत्या केली आहे. त्यांची हत्या करण्याआधी गोळीबार करण्यात आला. मग, डिरवेवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. ही घटना काल (३ फेब्रुवारी) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर आज (४ फेब्रुवारी) संतप्त ग्रामस्थांनी नागपूर-तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल २ तास खोळंबली होती.

दरम्यान, डिवरेंना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात नेईपर्यंत प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे आधीच त्यांचा मृत्यू झाला. डिवरे हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केले आहे. या हत्येतील अजून काही आरोरी फरार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी शिवसेनेचे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी सुनील डिवरेंच्या नातेवाईक, ग्रामस्थ व शिवसैनिकांना फोनवरून आवाहन करीत रास्तारोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गजानन काळेंच्या पत्नी थेट कृष्णकुंजवर!

News Desk

ED, CBIच्या धाडीनंतर किरीट सोमय्या विचारतात, “प्रताप सरनाईक कुठे आहात?”

News Desk

“आम्ही काय कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत?”, मुख्यमंत्री सभागृहात बरसले

News Desk