HW News Marathi
Covid-19

जाणून घ्या… महाराष्ट्रात चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू तर काय बंद?

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. महाराष्ट्र हा कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजारवर पोहचली आहे. राज्यातील चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोणत्या झोनमध्ये कोण्यात गोष्टींना शिथीलता मिळत देण्यात आली. या संदर्भात राज्य सरकारने आज (१९ मे) नवीन नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार, रेड झोन, ग्रीन झोल आणि कंटेनमेंट झोन करण्यात आले आहे. राज्यात आता २२ मेपासून रेड आणि नॉनरेड असे दोनच झोन अस्तित्वात असणार आहेत.

ही नियमावली येत्या २२ मे पासून लागू होणार आहे. यानुसार महाराष्ट्रात आता दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही झोनमध्ये कन्टेनमेंट झोन असणार आहे. राज्यात आता २२ मेपासून रेड आणि नॉनरेड असे दोनच झोन अस्तित्वात असणार आहेत. वैद्यकीय गरजेशिवाय अन्य गोष्टींसाठी ६५ पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि गर्भवती महिला, १० वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेड झोनमध्ये कोणती शहरे येतात ?

मुंबई परिसरातील सर्व महापालिका, पुणे महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या सर्वांचा आता रेड झोनमध्ये सामावेश होत आहेत. तर राज्यातील उर्वरित भाग हा नॉन रेड झोनमध्ये येणार आहे. कंटेन्मेंट झोनची जबाबदारी स्थानक प्रशासनावर देण्यात आली आहे.

काय बंद राहणार

  • आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद
  • अंतर्गत रेस्ते वाहतूक बंद
  • शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
  • हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार
  • चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जीम, पूल, पार्क, बार बंद राहणार
  • टँक्सी, कॅब आणि रिक्षा बंद
  • जिल्ह्या अंतर्गत वाहतूक बंद
  • सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
  • सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार
  • रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सक्त संचारबंदी
  • रेड झोनमध्ये चार चाकी, दोन चाकी वाहनांना अत्यावश्यक असेल तरच परवानगी.
  • रेड झोनमध्ये खासगी बांधकाम साईटसना परवानगी नाही.
  • रेड झोनमध्ये खासगी कार्यालयांना परवानगी नाही.
  • रेड झोनमध्ये शेती कामांना परवानगी नाही.
  • रेड झोनमध्ये शहरी भागात एकलदुकानांना मर्यादीत परवानगी

काय सुरू असणार

  • शेतीविषयक सर्व कामे सुरू
  • ई-कॉमर्स सेवांना कंटेनमेंट झोन वगळता परवानगी.
  • कंटेनमेंट झोन वगळता बँका, वित्तीय सेवा सुरु राहणार.
  • कंटेनमेंट झोन वगळता कुरियर पोस्टला सेवा सुरु राहणार.
  • सरकारी आणि खासगी कार्यलय ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सुरू
  • आपात्कालीन वाहतूक सुरू
  • होम डिलिव्हरी करणारी हॉटेल आणि कॅटीन सुरु राहणार

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रीन-ऑरेंज झोन जिल्ह्यात बाहेरून नागरिकांना पाठवू नये, कोरोनाची लोकांच्या मनात भीती !

News Desk

पुढील २ दिवसांत राज्यात जिम सुरु होणार ! मनसे-भाजपच्या मागणीची सरकारकडून दखल

News Desk

देशात कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पार !

News Desk