HW News Marathi
महाराष्ट्र

हाताला सलाईन, अंगात अशक्तपणा, तरीही धैर्यशील माने भर पावसात मराठा मोर्चाच्या अग्रस्थानी!

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा आज (१६ जून) काढण्यात आला आहे. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी सलाईन लावून मराठा मोर्चात सहभागी झालेले पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं, असं आवाहन मानेंनी मोर्चाच्या सुरुवातीला भाषणातून केलं आहे. दरम्यान, या आंदोलनात भाडपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही सहभागी झाले आहेत.

अंगात अशक्तपणा तरीही भर पावसात मानेंचा मोर्च्यात सहभाग

खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अशक्तपणा असल्याने ते घरात उपचार घेत होते. 10 दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. मात्र मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रकृती नाजूक असतानाही ते सलाईन लावून सहभागी झाले. कोल्हापुरात आज जोरदार पाऊस कोसळत आहे. मोठ्या पावसातही हा मराठा मोर्चा निघत आहे. मानेही पावसाची पर्वा न करता मोर्चात सहभागी झाले.

“संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं”

“महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे” असा विश्वास शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे.

“पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही आरक्षणासाठी भेटेन”

“आरक्षण कोणामुळे थांबलं? आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही? असे प्रश्न समाजाला पडले आहेत. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन” अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे.

“न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला. हा राज्याचा की केंद्राचा हा प्रश्न समाजाला आहे. एका बाजूला जनरेटा तयार होतोय, 48 खासदारांनी अधिवेशनाची मागणी करावी, लोकसभेचं अधिवेशन मराठा समाजासाठी झालं पाहिजे, राजेंनी संयमाने भूमिका घेतली आहे” असंही धैर्यशील माने म्हणाले.

सर्वपक्षीय नेते सहभागी

या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबा सिद्दीकीची ४६२ कोटी संपत्ती जप्त ईडीची कारवाई

News Desk

“…मी ओबीसी असल्यानं हे खातं मिळालं”, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

News Desk

माझ्या तोंडी ‘हे’ वाक्य टाकलं गेलंय ! अनिल देशमुखांनी ‘ते’ वृत्त फेटाळले

News Desk