HW News Marathi
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीने बालकल्याण समितीच्या प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या जबाबात दिली धक्कादायक माहिती!

बीड। राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.अशीच अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. चक्क सोळा वर्षाच्या(अल्पवयीन)मुलीवर सहा महिन्यात सहाशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार केले असल्याची घटना समोर आल्याने बाल कल्याण समिती अध्यक्ष तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी डॉ.अभय वनवे यांनी चिंता व्यक्त करत संगितले की,संबंधीत अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचे अनेकांनी अत्यंत क्रूरतेने शोषण केलेले आहे.विशेष म्हणजे सहा महिन्यात चारशेहून अधिका व्यक्तींनी अत्याचार केलेला आहे. यात एका पोलिस कर्मचा-याचा देखील समावेश असून संबंधित अल्पवयीन मुलगी वीस आठवड्याची गर्भवती आहे.तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.याची चौकशी करण्याच्या सुचना आम्ही दिलेल्या असल्याचे डॉ.वनवे म्हणाले.

याबाबत सविस्तर महिती अशी आहे की, सामाजिक कार्यकर्ते तथा बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांच्याकडे दोन दिवसापूर्वी एक तक्रार आली. या तक्रारीवरून केलेल्या तपासात गंभीर बाब समोर आली आहे. या संदर्भात माहिती देताना बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे म्हणाले की,जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एका सोळा वर्षाच्या मुलीची ट्रॅझेडी अक्षरश: अंगावर शहारे आणणारी आहे. लहान असतानाच आईचे छत्र हारवले. सात-आठ महिन्यापूर्वी वडिलांनी अल्पवयातच लग्न लावून दिले. सासरी नवरा संभाळत नसल्याने ती अल्पवयीन मुलगी वडिलांकडे रहायला आली. परंतू वडिलांनी देखील तिला संभाळण्यासाठी नकार दिला.अशा परिस्थितीत त्या मुलीला अंबाजोगाई येथील बसस्थानकांवर भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला.याच दरम्यान तिला अत्यंत वाईट घटनांना सामोरे जावे लागले असल्याचे संबंधीत अल्पवयीन मुलीने बालकल्याण अधिकारी यांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

काय म्हटलय जबाबात-

अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीने बालकल्याण समितीच्या प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझ्यावर अनेकांनी अत्याचार केला.याबाबत मी तक्रार घेवून अंबाजोगाई येथील पोलिस ठाण्यात अनेकवेळा गेले मात्र संबंधीत पोलिसांनी मला अनेकदा तेथून हूसकावून लावले. माझे म्हणणे ऐकून सुध्दा दोषीवर कारवाई केली नाही. एवढेच नाही तर एका पोलिस कर्मचा-याने देखील माझ्यावर अत्याचार केलेला आहे.असे त्या पिडीत अल्पवयीन मुलीने जबाबात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पूजाने आई-वडिलांचं ऐकलं असतं तर…”, पूजा चव्हाणच्या आजी-आजोबांची प्रतिक्रिया

News Desk

औरंगाबाद येथे पासपोर्ट कार्यालयाचे २८ मार्च रोजी उद्घाटन

News Desk

भाजपच्या माजी मंत्र्यांना मोठा धक्का, चुलत भावाचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk