HW News Marathi
महाराष्ट्र

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी ‘मिशन २८’ ठरले प्रभावी

अमरावती। मेळघाटात कुपोषणमुक्ती व आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून राबवलेले ‘मिशन 28’ प्रभावी ठरले आहे.

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी सातत्यपूर्ण मोहिम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार मेळघाटात पाड्यापाड्यांवर अधिकारी व कर्मचारी यांच्‍या गृहभेटी, आवश्यक उपचार, सल्ला व पाठपुरावा याद्वारे मोहिम राबविण्याचे निर्देश 28 दिवस मोहिम राबविण्यात आली.

मोहिमेदरम्यान उपचारांबरोबरच समुपदेशन व जनजागृती हा घटक महत्वपूर्ण ठरला. कमी वजन असलेल्या एका बालकाला रूग्णालयात संदर्भित करण्याबाबत त्याचे कुटुंबिय तयार नव्हते पण आरोग्य पथकांनी केलेल्या प्रभावी समुपदेशनाने कुटुंबियांचे मन वळविण्यात यश मिळाले. त्‍या बालकास भरती करण्‍यात आले व उपचारानंतर त्याचे वजन वाढून प्रकृती सुखरूप आहे. एका मातेच्या अंगावर सूज व लघवीत प्रोटीन आढळून आले. तिला वेळीच उपचार मिळाल्याने ती सुखरूप आहे.

मोहिमेत आरोग्‍य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, भरारी पथक, समुदाय अधिकारी, आरोग्‍यसेविका, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांच्‍या पाड्यापाड्यांवर भेटी वाढल्‍याने प्रभावी जनजागृती व पाठपुरावा झाला. माता व बालकाचे धोके व जोखीम ओळखून आजाराचे निदान लवकरात लवकर करण्‍यात यश आले.

जे नवजात बालक कमी वजन, हायपोग्‍लासेमिया, हायपोथर्मिया, अतिसार, तीव्र जंतुसंसर्ग, न्यूमोनिया, नवजात बालकांना होणारा काविळ आदींमुळे ग्रस्त होते, त्यांना वेळेत उपचार मिळवून देण्यात आला. माता व बालकाचे निरंतर निरीक्षण, पाठपुरावा व तपासणी 28 दिवसांपर्यंत करण्यात आली.

मोहिमेत प्रत्‍येक अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या गृहभेटींची छायाचित्रांसह नोंद ठेवली. त्यामुळे मोहिमेत ही व्यापक प्रक्रिया परिपूर्णपणे राबविण्यात यश मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चर्चा करायची नसेल तर आम्ही घरी जातो…फडणवीसांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

News Desk

“कोणी तरी मरावे हे माझ्या संस्कृतीत बसत नाही,” सुप्रिया सुळेंनी केतकीला खडेबोल सुनावले

Aprna

“आता संप मागे घेतला तरी करवाई मागे घेणार नाही!”

News Desk