HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभेत नामांतराचे तीन प्रस्ताव मंजूर; दोन जिल्हे आणि एका विमानतळाचे नाव बदलले

मुंबई | शिंदे सरकारच्या पहिल्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनात औरंगाबादचे (Aurangabad) नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे (Osmanabad) नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील करण्याच्या प्रस्ताव आज (25 ऑगस्ट) विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. विधानसभेत आज नामांतराचे तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

विधानसभेच्या शेवटच्या दिवशी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव या दोन शहरांच्या नामांतर करण्यात आले असून  नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या बैठकीत सुद्धा नामांतरला मंजूर मिळाली आहे.

1998 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धारशिव करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु, हा निर्णय सरकारने 2001 मध्ये रद्द केला होता. तर राज्य सरकारने नामांतराचा घेतलेला निर्णय हा राजकीय हेतूनचे घेतल्याचा दावा याचिकाकार्त्यांनी केला होता.  महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत नामांतराचा निर्णय घेतला होता. यानंतर राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले. आणि शिंदे सरकारने आज नामांतर ठरवा विधानसभेत मंजूर केला आहे.

 

 

Related posts

लक्झमबर्गचे पंतप्रधान, राजपुत्र यांची महाराष्ट्र दालनाला भेट ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा

Aprna

राम कदम यांना जनआक्रोश आंदोलनापुर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

नारायण राणे थेट उच्च न्यायालयात जाणार!

News Desk