HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

चंद्रकात पाटील माफी मागा,राष्ट्रवादी आक्रमक !

Chandrakant Patil

मुंबई | न्यायालयसुध्दा चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांतदादा पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात अशी धमकी दिली होती. यावर नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.

दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा पध्दतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.  आजपर्यंत भाजपकडून एजन्सीचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झाले आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.

Related posts

वाधवान कुटुंब महाबळेश्वरला कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने गेले, सीएम आणि गृहमंत्र्यांना फडवीसांचा सवाल

News Desk

अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा

News Desk

खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिली आनंदाची बातमी

News Desk