HW News Marathi
Covid-19

राज्यात आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वेगाने वाढतच असताना आजपासून (१५ जून) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुरू करण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे शैक्षणिक वर्ष आजपासून प्रत्यक्ष शाळांना सुरुवात होणार नसली तरी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र मात्र सुरू होणार आहे. हे ऑनलाइन अभ्यासक्रमाद्वारे शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. तसेच आजपासूनच ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक तसेच पोषण आहाराचे वाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान, वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम कसा घ्यावा. यासाठी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची व स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. या मदतीने अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून विद्यार्थ्या ऑनलाईन सर्व माध्यमाचे ई-साहित्य तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना कम्युनिटी रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क, दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व पोषण आहाराचे वितरण करण्यासाठी शाळेत बोलविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची जबाबदारी त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामीण भागातील विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे कठीणच !  

News Desk

दिलासादायक ! महाराष्ट्रातील पहिले दोन पाॅझिटिव्ह रूग्ण झाले निगेटिव्ह

Arati More

अखेर सत्य पुढे आलेच ! मुंबईत ८६२, तर अन्य जिल्ह्यांतील ४६६ कोरोना मृत्यू जाहीर !

News Desk