HW News Marathi
महाराष्ट्र

#COVID19 : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८६८वर, आज दिवसभरात १२० रुग्णांची नोंद

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. देशभरात लॉकडाऊन असून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या ८६८ वर येवून पोहचली असून गेल्या २४ तासांत१२० रुग्णांची नोंद झाली आहे. एवढेच नाही तर १५० संशयित रुग्णांना विविध रुग्मालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. राज्यात आज (६ एप्रिल) सात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण ५२वर पोहोचली तर दुसऱ्याबाजुला राज्यातील ५ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. राज्यात मृतांचा आकडा ५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीच्या जळपासचा मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच असलेल्या चहा विक्रेत्याची प्रकृतीची बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करणयात आले. या चहा विक्रेत्यांची तपासणी केल्यानंतर कळाले की, त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पीटीआयने वृत्त दिले आहे. त्यामुळे खबदारीचा उपाय म्हणून कलानगर परिसर सील केला आहे.

राजेश टोपे म्हणाले, राज्य सरकार आता पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई), व्हेंटिलेटर आणि एन ९५ मास्क खरेदी करु शकणार नाही. केंद्र सरकार स्वतः संबंधित सर्व साहित्य खरेदी करुन राज्यंना पुरवणार आहे, असे केंद्राने राज्याला कळवले आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने केंद्राकडे २ हजार १२५ व्हेंटिलेटर, ८ लाख ४१ हजार एन ९५ मास्क, ३ लाख १४ हजार पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची मागणी केली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या

  • मुंबई – ५२६
  • पुणे (शहर व ग्रामीण) – १४१
  • सांगली – २५
  • ठाणे मंडळ – ८५
  • नागपूर – १७
  • अहमदनगर – २३
  • यवतमाळ – ४
  • लातूर – ८
  • बुलडाणा – ५
  • सातारा – ४
  • औरंगाबाद – १०
  • उस्मानाबाद – ३
  • कोल्हापूर – ३
  • रत्नागिरी – २
  • जळगाव – २
  • सिंधुदुर्ग – १
  • गोंदिया – १
  • नाशिक – २
  • वाशीम – १
  • अमरावती – १
  • हिंगोली – १
  • जालना – १
  • इतर राज्य (गुजरात) – २
एकूण – ८६८

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मी ओबीसी असल्यानं हे खातं मिळालं”, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

News Desk

सांगलीमधील सहकारी बँकेचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली

News Desk

राज्यात आजपासून संचारबंदी लागू, जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार

swarit