HW News Marathi
महाराष्ट्र

#coronavirus : राज्यातील रुग्णांची संख्या १५३ वर, मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षाच्या एका वृद्धेचा मृत्यू

मुंबई। राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज (२७ मार्च) एका दिवसात २८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून आता सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १५४ वर गेली आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांची सर्वात जास्त नोंद ही एकट्या सांगलीत १५ व्यक्ती, तर नागपूरमधील बाधित आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे ४ जणांना कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

याव्यतिरिक्त मुंबई आणि ठाणे प्रत्येकी २ रुग्ण आढळून आले असून पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे तर १ रुग्ण गुजरात राज्यातील आहे.

आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षाच्या एका वृद्धेचा मृत्यू झाला असून राज्यातील हा पाचवा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्र्यांच्या माहिती नुसार, राज्यात आज २५० जण विविध रुग्णालयांत भरती झाले असून आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३०५९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर १५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २२ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६, ५१३ व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून १०४५ जण संस्थात्मक क्वॉरेंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या

मुंबई – ५१

पिंपरी चिंचवड – १३

पुणे – १९

सांगली – २४

नवी मुंबई – ६

कल्याण-डोंबिवली – ६

नागपूर – ९

ठाणे – ५

यवतमाळ – ४

अहमदनगर – ३

सातारा – २

कोल्हापूर – १

पनवेल – २

उल्हासनगर – १

औरंगाबाद -१

रत्नागिरी – १

वसई-विरार – १

सिंधुदुर्ग – १

गोंदिया – १

एकूण – १५३ कोरोनाबाधितांची संख्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही, शरद पवारांचे स्पष्टीकरण 

News Desk

भाजप आमदाराच्या 500 कोटी प्रकरणाची चौकशी का नाही? भावना गवळींचा थेट सवाल!

News Desk

मुख्यमंत्री यांच्या पाठोपाठ आता पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र!

News Desk