HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ३३ वर पोहचला, तर देशात रुग्णांचा आकडा ११० वर

मुंबई | राज्यात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर पोहचली आहे. तर राज्यात ९५ वर कोरोना संशयित रुग्णांना भरती करण्यात आली आहे. यानंतर आत देशात कोरोना रुग्णांची संख्या ११० वर गेली तर महाष्ट्रात रुग्णांची संख्या जास्त आहे. यामध्ये ९६ रुग्णावर उपचार सुरू असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना व्हायरस प्रादुर्भाव पाहाता राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा-कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात सध्या पुणे-पिंपरी १६, यवतमाळ २, मुंबई ५, नागपूर ४, नवी मुंबई २,कल्याण , ठाणे, औरंगाबाद, अहमदनगर प्रत्येकी १, अशी कोरोनाग्रस्तांची संख्या ३३वर आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. येत्या १५ ते २० दिवसांत पुण्यात नव्या लॅबच्या सुविधा देणार आहेत. डॉक्टरांना लागणारी सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. याशिवाय, मिरज, सोलापूर, धुळे आणि औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात पुढील १५ दिवसात अशी यंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरू करणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (१६ मार्च) पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री घेणार कोरोना आढावा बैठक

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (१६ मार्च) आढावा बैठक बोलविली आहे. ही बैठकी आज दुपारी १२.३० वाजता वर्षा निवास्थानावरून व्हिडिओ कॉन्फरें होणार आहे. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील बैठकीत उपस्थित असणार आहे.

मोदींनी मुख्यमंत्र्यांना फोन करून घेतली माहिती

मोदींनी मुख्यमंत्र्यांना काल (१५ मार्च) दुपारी फोन केला होता. या दोघांमध्ये जवळपास १५ मिनिटे राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्या आणि संशयित रुग्णांच्या माहिती घतली. राज्यात काल सकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ होती. मात्र, काल दुपारी औरंगाबाद येथील ५९ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. रशिया व कझाकिस्तानचा प्रवास करून ही महिला भारतात परतली आहे. सध्या औरंगाबादेतल्या धूत रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संजय राऊतांची राहुल गांधींसोबत बैठक’,राऊतांनी सांगितलं भेटीमागचं कारण!

News Desk

नवनियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे! – मुख्यमंत्री

Aprna

मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा !

swarit