HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पंढरपूरची निवडणूक ठरली घातक! गावागावांत रुग्णांचे मृत्यू, हॉस्पिटल्सही भरले

पंढरपूर | राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे मात्र निवडणूकीची रणधुमाळी सुरु होती. १७ एप्रिलला या पोटनिवडणूकीसाठी मतदानपार पडले होते. कोरोनामुळे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले पोटनिवडणुक लागली
या निवडणुकी नंतरचे कोरनाचे भीषण चित्र समोर येऊ लागले आहे. गावंच्या गावं आता आजारी पडू लागली असून हॉस्पिटलमध्ये रुग्ण ठेवायला जागाच उरली नाही आहे.

अशातच रोज शेकडोंच्या संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड सगळ्या बाबी अपूऱ्या पडू लागल्या आहेत. ज्या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे त्यांच्या मृतदेहाला मिळेल त्या जागी अग्नी दिला जात आहे.

दरम्यान, ९ एप्रिलला मंगळवेढ्यात ४२ तर पंढरपूरात १५१ नवे रुग्ण आढळले होते. या रुग्णसंख्येच्या आधी अजित पवार यांची सभा झाली होती. आत्तापर्यंत पंढरपूर तालुक्यात ११,३०० रुग्ण आढळले असून २६४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या ७ दिवसांत १००० पेक्षा जास्त रुग्ण पंढरपूरात आढळले आहेत. पंढरपूर- मंगळवेढ्यात गेल्या १५- २० दिवसांत एका दिवसाला ६० वरील रुग्णसंख्या निवडणूकीनंतर २४६ वर गेली आहे. तर याच काही दिवसांत १० च्या वर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या २ तालुक्यांत मिळून १५-२० दिवसांत रोज २८१३ नवे रुग्ण आढळले आहेत.

एकूणच राज्यात सर्वत्र अशीच स्थिती असली तरी त्याची भीषणता पंढरपूर मंगळवेढा येथे जास्त पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या सभा झालेल्या भोसे, बोराळे सारख्या अनेक गावात बरेच कोरोना रुग्ण आढळत आहेत. मंगळवेढा तालुक्यातही २५ गावांत सध्या कोरोनाचा कहर सुरु असून इतर गावातही रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.

एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेत आपल्याच कार्यकर्त्यांचे मास्क बाबत अतिशय कटू शब्दात कान टोचले असले तरीही त्या गावांत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्याही सभेच्या गर्दीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. या पोटनिवडणूकीत केवळ सामान्य नागरिकच नाही तर याच निवडणूकीसाठी ज्या नेत्यांनी सभा घेतल्या ते ही या कोरोनाने ग्रस्त झाले आहे.

याच दरम्यान प्राचारासाठी आलेले राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे, अमोल मिटकरी, भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. निवडणुकांनतर जिल्ह्यात दररोज १००० च्या पुढेे रूग्ण आढळले आहेत. रोज सरासरी ८ ते १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे तर मंगळवेढा येथेही थोड्या फार फरकाने हीच परिस्थिती आहे.

Related posts

सिमेंट रस्त्यावर पुन्हा रस्ता

News Desk

आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी केलं, बघूया शिवसेनेची किती औकात उरलीये,निलेश राणेंचा प्रहार

News Desk

पश्चिम बंगाल व्यतिरिक्त ‘या’ राज्यांत सीबीआयला बंदी

News Desk