HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता वाढली,मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान !

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढत आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल ४९,४४७ रूग्णांची नोंद झाली आहे.वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यात लॉकडाऊनची शक्यता अधिक गडद होत चालली आहे.दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना महत्वाचा निर्णय घेण्याचे संकेत दिले होतो,तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी उपाय सुचवण्याचं आवाहनही केलं होतं. शुक्रवारी झालेल्या या फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नियम पाळण्याचं आवाहन केलं, तसेच कडक निर्बंध लागू करण्यास भाग पाडू नका असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस वेळ घेणार असं सांगितल्यानंतर त्यांच्या बैठकांचे सत्र सतत सुरू आहे. या दरम्यान महाराष्ट्रात लॉकडाऊन हा एकच पर्याय कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरजेचा असल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला मिनी लॉकडाऊन करण्याचा विचार सरकारतर्फे करण्यात येत होता, परंतु कोरोना प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढत असल्याने कडक लॉकडाऊन हा एकच पर्याय शिल्लक राहत असल्याचं बोललं जात आहे.

वृत्तपत्र संपादक,मालक यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे,राजेश टोपे काय म्हणाले ?

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी राज्यातील वृत्तपत्र संपादक, मालक आणि वितरक यांच्यासोबत एक बैठक घेतली आणि यासंदर्भात चर्चा केली. या चर्चेदरम्यान राज्यातील आरोग्यव्यवस्थेवर यंत्रणेवर येणारा ताण ही चिंतेची बाब असून लाॅकडाऊन शिवाय सध्या कोणता पर्याय नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोलून दाखवलं आहे. त्याबरोबरच कठोर निर्बंध लावून कोरोना रोखण्यासाठीचे प्रयत्न सरकारतर्फे करण्यात आले, पण लोक नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात लाॅकडाऊन करून हळूहळू सर्व सेवा पूर्वपदावर आणल्या तर त्याचा फायदा कोरोना रोखण्यासाठी नक्कीच होऊ शकतो, असं सूचक वक्तव्य संपादक आणि मालकांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

शनिवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्राचे संपादक मालक आणि वितरक यांच्याशी लाॅकडाऊन शिवाय काही दुसरा पर्याय आहे का? यासंदर्भात चर्चा केली आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदर्भात काही सूचना केल्यास त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार केला जाईल असं संपादकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्र सरकारमुळे देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला बसला फटका”, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारलं

News Desk

उद्धव ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरण टाळता आले असते !

News Desk

२ दिवसात खत दरवाढ मागे घ्या, नाहीतर राज्यभर घंटानाद आंदोलन करणार !

News Desk