HW News Marathi
महाराष्ट्र

‘साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी’!

मुंबई। मुंबईला हादरवून सोडणारी घटना आज(११ सप्टेंबर) साकीनाक्या परिसरात घडली आहे. एका ३६ वर्षीय महिलेवर एका इसमाने बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला होता. त्या पीडितेवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार चालू होते, मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अनेक राजकीय नेते संताप व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवायचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणात अधिक माहिती दिली आहे. हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

जखमी महिलेला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आरोपीविरोधात 307, 376 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मोहन या आरोपीला संशयावरुन ताब्यात घेतलं आहे. तो जोनपूरचा रहिवासी आहे. या आरोपीच्या अंगावर रक्ताचे डाग होते. न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील एक महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू, असा दावाही मुंबई पोलिस आयुक्तांनी केला आहे.

महिलेचा जबाब नोंद करता आला नाही

“साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल केली जाईल.”, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

“साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे.”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. “हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

बलात्कार प्रकरण- फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

साकीनाका बलात्कार प्रकरणात पीडितेला योग्य वेळी न्याय मिळावा या साठी ही केस फास्ट ट्रक कोर्टवर चालवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे होत होती. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणे 27 ऑगस्टला भाजपात प्रवेश करणार

News Desk

“आधी राष्ट्रवादीला बुडविण्याची भाषा, नंतर भुजबळांचा बाप काढला” शिवसेना खासदाराचा राग अनावर!

News Desk

आदर्श सरपंच असलेल्या भास्कर पेरे पाटलांचा पराभव तर हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनी झाली निवडणुक

News Desk