HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महाराष्ट्र राज्यपाल पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती झाल्याची माहिती माध्यमातून समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. यात महाराष्ट्राच्या राज्यपालांचा समावेश आहे.

 

दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून राज्यपालांच्या अभिभाषण विरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होते. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. महाविकास आघाडी महापुरुषांच्या अपमानाविरोधात राज्यपालांनी राजीनामा द्यावा म्हणून राज्यभरात आंदोलन केली होती.

राज्यपालांनी प्रसिद्ध पत्रात नेमके काय म्हणाले

गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ राज्यातील सर्व सामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी मी कधीही विसरणार नाही. नुकत्याच माननीय पंतप्रधानांच्या मुंबई दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

Related posts

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल !

News Desk

“खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, सर्वच तुमचे, लोकांची सेवा कधी करणार?,” दरेकरांचा सवाल

News Desk

काँग्रेस पक्षाच्या प्रचार मोहिमेचा ४ फेब्रुवारीला उस्मानाबाद जिल्ह्यातून शुभारंभ

News Desk