HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात मोठी शिथिलता’, अशी असेल नियमावली!

मुंबई। कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका अद्याप कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 22 जिल्ह्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असणार आहेत. हे 22 जिल्हे कोणते आहेत, त्यात कोणत्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलीय? तर कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे निर्बंध कायम राहणार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांबाबत आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्णय घेईल, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे नव्या नियमानुसार 22 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. सरकारच्या या नियमावलीमध्ये मुंबई लोकल रेल्वेचा कुठेही उल्लेख नाही.

नवी नियमावली काय असेल

1. सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.

2. सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी

3. सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

4. जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.

5. कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी.

6. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी

7. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद.

8. सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार.

9. शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित विभागाच्या आदेशानुसार नियम लागू राहणार.

10. सर्व रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार. हा नियम सोमवार ते शुक्रवार लागू असेल. यावेळी कोरोना नियमांचं पालन बंधनकारक असेल. पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार.

11. रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार.

12. वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चा, आंदोलनावर बंदी.

13. राज्यभरात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणं बंधनकारक असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारनं सात-बारा कोरा करण्याचा शब्द पाळला नाही – विखे पाटील

News Desk

मुंबई महापालिका निवडणूकीत ‘बिहार पॅटर्न’ राबवण्याचे आशिष शेलारांनी दिले संकेत

News Desk

यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू नाही | नागपूर खंडपीठ

News Desk