HW News Marathi
महाराष्ट्र

MarathaReservation | संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांनी दिलं निमंत्रण

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज (१५ जून) कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीयांच्या नेतृत्त्वात या मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. त्यानुसार हा मोर्चा निघत आहे. हे आंदोलन मूक असणार आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शाहु महाराजांच्या समाधीस्थळावरुन याची सुरुवात झाली आहे. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी आहे. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांचं निमंत्रण

राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करणे आमचं कर्तव्य, सुप्रीम कोर्टातील वकिलांची टीम आपण बदलली नाही. केंद्र आणि राज्याच्या समनव्याची जबाबदारी संभाजीराजे तुमची आहे, राजेंनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक आहे, मुख्यमंत्री आणि प्रमुख मंडळींना आपल्यासोबत बसून चर्चा करायची, उद्या तुम्ही मुंबईलाला यावं, उद्या मुख्यमंत्री, अजितदादा भेटतील आहे, राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, हातात हात घालून चालायला हवं, संयमाच्या भूमिकेचं कौतुक आहे, संयमाला चर्चेची साथ देऊ, राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो, असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे.

संभाजीराजेंच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक, चर्चा करुन मार्ग काढूया : सतेज पाटील

“संभाजीराजे यांच्या मागण्याबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक आहे. सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. पुन्हा एकदा भेटून चर्चा करणं गरजेचं आहे. संभाजीराजे यांना उद्याच्या उद्या वेळ द्यायला तयार आहेत. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढूया. हातात हात घालून आपण काम केलं पाहिजे. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नाही,” असं आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलं. “कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. उच्च न्यायालयात टिकलेला कायदा सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. हे आंदोलन ज्या उद्दिष्टाने सुरु केलं आहे त्या उद्दिष्टापर्यंत जावं. सरकारने काही केलं नाही हे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. जे आधीचे वकील होते तेच मुद्दा मांडत होते, मात्र कोर्टाचा निर्णय विरोधात आला, असा टोला सतेज पाटील यांनी भाजपला लगावला.

४८ खासदारांनी एकत्र यावं, मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे – धैर्यशील माने

महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व प्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल. आरक्षण कोणामुळे थांबलं, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं.

मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले. न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला. हा राज्याचा की केंद्राचा हा प्रश्न समाजाला आहे..एका बाजीला जनरेटा तयार होतोय, 48 खासदारांनी अधिवेशनाची मागणी करावी, लोकसभेच आधिवेशन मराठा समाजासाठी झालं पाहिजे, राजेंनी संयमाने भूमिका घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून राज्यपालांची भेट घेण्याचं सत्र सुरूचं ! आमदार ,खासदारांची घेतली राज्यपालांची भेट

Arati More

फडणवीसांनी स्वत:ची नेमणूक विशेष अधिकारी म्हणून करावी…! – नवाब मलिक

Aprna

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे मुंडे गटात नाराजी? भावनिक पोस्ट झाली व्हायरल

News Desk