मुंबई | सलग चौथ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक घसरण सुरू आहे. कोरोना व्हायरसचा फटका जगभरातील शेअर मार्केटला पडताना दिसत आहे. आज (१३ मार्च) सकाळी शेअर मार्केटला सुरुवात होताच निर्देशांकात ३४०० अंकांनी कोसळला. निफ्टीत ९०० अकांहून अधिक घसरण झाली होती. त्यामुळे शेअर बाजाराचे ट्रेडिंग ४५ मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आले होते. शेअर मार्केट ४५ मिनिटांनंतर पुन्हा सुरु झाला आणि निर्देशांक सावरले. सेन्सेक्सने ३०० अंकांनी झेप घेतली. निफ्टीत ९६ अंकांची वाढ झाली होती.
Sensex reopens after 45 minutes halt due to lower circuit; plunges 3518.49 points, at 29206.20 currently pic.twitter.com/7lcc8BFCwR
— ANI (@ANI) March 13, 2020
मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. त्यामुळे, याचा फटका गुंतवणूकदारांना बसला असून तब्बल ११ लाख कोटी रुपये बुडाल्याची माहिती आहे. तसेच काल (१२ मार्च) दुपारी २.४० वाजता सेन्सेक्समध्ये ३१०० अंकांची घट होऊन ३२,६०० वर बंद झाला होता. तर निफ्टीत ९५० अंकांनी घसरण झाली असून ९,५०० अंकांवर स्थिरावला होता. जुलै २०१७ नंतर निफ्टी ९६०० च्या स्तराच्या खाली पोहोचला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.