HW News Marathi
महाराष्ट्र

‘या’ शिवसेना आमदाराने आपली ९० लाखांची एफडी जनतेला रेमडेसिवीर द्यायला मोडली !

हिंगोली | राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आणत आहे. अशात अनेक जण आपापल्या परीने लोकांना, सरकारला मदत करत आहेत. अशाच एका शिवसेनेच्या आमदाराने स्वत:ची FD मोडून लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले आहेत.शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले आहे. गेल्या १०-१२ दिवसांपासून कोरोनाचा वाढता कहर चिंता वाढवणारा आहे. अशात औषधांचा तुटवडा हीसुद्धा गंभीर समस्या बनली आहे. मात्र, आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी आणि जीव महत्त्वाचं मानून आमदारांनी आपलं कर्तव्य दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे.

काय आहे प्रकरण?

सुरुवातीला ९०० रुपये दराने जवळपास ५०० इंजेक्शन्स आणून आमदार संतोष बांगर यांनी मोफत वाटले होते. मात्र नंतर या इंजेक्शन्सचा तुटवटा निर्माण झाला आणि दर वाढले. त्यानंतर १८०० रुपयांनी काही इंजेक्शन्स वाटले. नंतर त्यांच्याकडे इंजेक्शन्स मिळतात, म्हणून त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले. मात्र बाजारपेठेत व इतर जिल्ह्यांतही इंजेक्शन्स मिळत नसल्याने अडचणी वाढल्या होत्या. अशातच जिल्ह्यातील इंजेक्शनचाही स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कुणी भोगायच म्हणून एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता.

ही बाब संतोष बांगर यांच्या कानावर गेली. त्यांनीही प्रशासकीय चाकोरीला मुरड घालून ऑर्डर देण्याचे प्रयत्न केले. मात्र, यातून काहीच मार्ग निघत नव्हता. यात अग्रीम देण्यास विलंब होत असल्याचे लक्षात घेता एका खासगी वितरकास स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील ९० लाखांची रक्कम उपलब्ध करून दिली. त्यात त्यांना ५ ते ६ लाखांचे नुकसान सोसावे लागणार आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेव्हा निधी देईल, तेव्हा तो बांगर यांना मिळणार आहे. त्यातही ना नफा, ना तोटा या तत्त्वावर त्यांनी ही उपलब्ध करून दिली आहे. आता दोन दिवसांत हे इंजेक्शन्स उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, याबाबत संतोष बांगर म्हणाले की, सध्याचा कोरोनाचा काळ हा अतिशय वाईट आहे. लोकांचे जीव वाचविण्यासाठी जे शक्य आहे, तेवढे करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोरोना वॉर्डामध्ये फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत. त्यामुळे इंजेक्शनसाठीची अडचण दूर करण्यासाठी मदतीचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आमदाराच्या या प्रयत्नामुळे का होईना पण लोकांना औषधे उपलब्ध करुन दिली जात आहेत आणि समाजात एक आदर्श निर्माण केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिया चक्रवर्तीचा हायकोर्टाकडून जामीन मंजूर!

News Desk

गुप्तेश्वर पांडे वरिष्ठ अधिकारी होते मात्र भाजपचे नेते असल्यासारखे बोलत होते, गृहमंत्र्यांचा टोला

News Desk

कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे पाप कोणाचे याचे आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावे!

News Desk