HW News Marathi
महाराष्ट्र

गौरी सावंत यांच्या तृतीयपंथी मातृत्वाची उलगडली कथा !

पुणे | जागतिक मातृदिनानिमित्त ‘क्रिएटिंग पॉसिबिलीटीज्’ संस्थेच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी सामाजिक काम करणार्‍या , सर्वोच्च न्यायालयात लढा देणाऱ्या तसेच मुलगी दत्तक घेऊन मातृकर्तव्य करणार्‍या तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

‘क्रिएटिंग पॉसिबिलीटीज्’चे संस्थापक रिदम वाघोलीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुधीर वाघोलीकर,आशय वाघोलीकर, सौ. अनू वाघोलीकर यांच्या हस्ते मातृशिल्प देऊन गौरी सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

गौरी सावंत यांची मुलगी यशश्री आणि भावी जावई हितेश वाटवे यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.

‘गौरी सावंत-द एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरी ऑफ द फर्स्ट ट्रान्सजेंडर मदर’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. ‘एलिजियम बँक्वेट्स’, घोले रस्ता येथे रविवारी 13 मे 2018 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता झाला. याच कार्यक्रमात डॉ. सोनिया नगराळे यांनी ‘तृतीयपंथीयांचे कायदेशीर हक्क’ या विषयावर मार्गदर्शन केले.

गौरी सावंत म्हणाल्या, ‘ मी पुरुष म्हणून जन्माला आले, पण स्त्री सुलभ वागावे, राहावे वाटायचे. किशोरवयातच मला ‘गणपत पाटील ‘ म्हणून चिडवले जाऊ लागले. घरात कधीही वाढदिवस साजरा झाला नाही. मग मुंबईला पळून गेले. मग मी स्त्री म्हणून अभिव्यक्ती जपत राहिले. अर्धपोटी राहिले सिग्नलला भीक मागावी लागली.

माझी आई ‘ विठ्ठल ‘ माऊली आहे. आणि मातृत्व ही अमर भावना आहे. अशा शब्दात गौरी व्यक्त झाल्या. शालेय शिक्षणात नपुसकलिंगी म्हणजे काय विचारले, सांगीतले जात नाही. भारतात जेंडर इक्विलिटी अजून नाही. महाराष्ट्रात पुरोगामी विचार असूनही अजून तृतीयपंथीयांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत.

लग्न व्हावे ही माझी ही अपेक्षा होती. पण, लैंगीकता – भूक याच्यापेक्षा जबाबदारी जास्त कळत गेली. मग स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम सुरू झाले. एचआयव्ही झालेल्या महिलेच्या मृत्युनंतर तिच्या ५ वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले. आणि मातृत्वाचा प्रवास सुरू झाला…

२०१४ साली बांगड्या गहाण ठेऊन सर्वोच्च न्यायालयात जेंडर स्टेटस लढण्याची याचिका दाखल केली. २०१४ ला पुनर्जन्म झाला आणि तृतीयपंथी म्हणून ओळख मिळाली म्हणून माझे वय आज ४ वर्षाचे आहे. !

‘ चारचौघी ‘, ‘नानी घर ‘ सारख्या संस्थाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाची माहितीही गौरी सावंत यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आरे’तील भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा काँग्रेसचा डाव भाजपानेच हाणून पाडला होता ! | आशिष शेलार

News Desk

सचिन वाझे प्रकरणाचा सरकारला कोणताही धोका नाही, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचं विधान

News Desk

चेंबूर दुर्घटनेप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया..!

News Desk