HW News Marathi
महाराष्ट्र

साखरेच्या गोडव्याने अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यातील कटुता संपली? पाटील- पवार यांच्यात गुफ्तगु..

पुणे | वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या (व्हीएसआय) वार्षिक पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने राजकारणातील एकमेकांचे विरोधक बनलेले राजकारणी आज एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं ते शरद पवार – विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गप्पांनी आणि अजित पवार – हर्षवर्धन पाटील यांच्या गुफ्तगुने ..

गेल्यावर्षी झालेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मात्र, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला , त्यामुळे विजयसिंह यांची राष्ट्रवादीसोबत फारकत झाली होती . मात्र आजच्या कार्यक्रमात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते यांच्यात जवळजवळ १५ मिनिटे चर्चा झाल्याचं चित्र पाहायला मिळाला. तर दुसरीकडे अजित पवारांनी माझं तिकीट कापलं , मला उमेदवारी देतो असं सांगून फसवणूक केली असा आरोप करणारे सध्याचे भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील आणि अजितदादा यांच्यात बराच वेळ गुफ्तगु चाललेलं चित्र आज पाहायला मिळालं.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील, हर्षयर्धन पाटील व अजित पवार यांनी एकमेकांवर आरोप केले होते. इंदापूरची जागा आपल्यासाठी सोडली जात नाही हे लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी एका रात्रीत भाजपात प्रवेश करून इंदापूरमधून भाजपाची उमेदवारी मिळवली होती. या साऱ्या राजकीय पार्श्‍वभूमीनंतर सत्ताबदल झाला आणि या कार्यक्रमानिमित्त हे सारे एकाच व्यासपीठावर परत एकत्र आले.

राजकारणात कोणीही एकमेकांचा मित्र किंवा शत्रू नसतो असे बोलले जाते.त्यामुळे अनेक वेळा एकमेकांविरुद्ध टीकेच्या माध्यमातून आग ओकणारे नेते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात.तसेच चित्र आज पाहायला मिळाले. अजितदादा- हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार- विजयसिंह पाटील यांच्यात काय चर्चा झाली असेल ? तुम्हाला काय वाटत ते आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा ..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचा आज एकदिवसीय अमरावती दौरा, विदार्भात मोठा पोलीस बंदोबस्त

Aprna

भाजपच्या एक दिग्गज नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

राष्ट्रवादीत आणखी एका मोठ्या नेत्याची एन्ट्री!

News Desk