HW News Marathi
देश / विदेश

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई | राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काही महत्वांच्या नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआयचा सासेमिरा लागला आहे. अशात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने तिसरं समन्स बजावलं आहे. देशमुख यांना येत्या 5 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी देशमुख दिल्लीला रवाना झाले असून सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

अनिल देशमुखांना ईडीने दोनदा समन्स बजावलं होतं. आधी त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचं कारण देऊन ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. नंतर त्यांनी सात दिवसाची मुदत मागवून घेतली होती. येत्या सोमवारी म्हणजेच ५ जुलैला त्यांची ही मुदत संपत आहे. त्यामुळे ईडीने आज त्यांना समन्स बजावलं असून सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ईडीचा कागदपत्रं देण्यास नकार

दरम्यान, ईडीने देशमुख यांच्याकडे काही कागदपत्रं मागितली आहे. त्यासाठी देशमुख यांनी ईडीकडे ‘ECIR’ ची कॉपी मागितली होती. ती देण्यास ईडीने नकार दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात आधी देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता देशमुख यांची ईडीने चौकशी सुरु केली आहे. २५ जूनला रोजी ईडीने देशमुख यांच्या पाच ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर ईडीने देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक केली. अंमलबजावणी संचालनालय मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना अपोलो रुग्णालयात हलविले, मल्लिका दुआ यांची माहिती

News Desk

संजय राऊतांना UPAच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करण्याचा अधिकार नाही !, नाना पटोलेंनी सुनावले

News Desk

आता सागरी मार्गाने देशात शिरण्यासाठी दहशवाद्यांचे प्रशिक्षण सुरू !

News Desk